Deola Crime | देवळ्यात भरदिवसा घरफोडी; चोराने रोख रक्कम व सोने केले लंपास

0
123
Deola crime
Deola crime

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |   येथील ज्ञानेश्वर नगर (वाखारी रोड) परिसरात गुरुवारी (दि. १८) रोजी भरदिवसा सकाळी ९ वाजेच्या सुमारास धाडशी घरफोडी झाली असून, यात सुमारे दीड लाख रुपये रोख व १५ तोळे सोने असा सुमारे १२ लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. अज्ञात चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला असून, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी नाशिकहुन फिंगर प्रिंट व डॉग पथकाला पाचारण करण्यात आले होते. देवळा पोलिसांनी घटनस्थळी भेट देऊन पंचनामा करून अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.(Deola Crime)

Deola Crime | देवळ्यात चोरांचा सुळसुळाट; भरदिवसा चोरट्यांनी सेवानिवृत्त शिक्षकाला लुबाडले

Deola Crime | नेमकं काय घडलं..?

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, देवळा येथील ज्ञानेश्वर नगर (वाखारी रोड) परिसरात राहणारे आदेश बोअर वेलचे संचालक आदेश ठाकरे हे आज गुरुवारी (दि. १८) रोजी सकाळी ७ वाजता सहकुटूंब नाशिकला गेले होते. अज्ञात चोरट्याने घर बंद असल्याचा फायदा घेऊन सकाळी ९ वाजेच्या सुमारास घराचे कुलूप तोडून घरातील कपाटात व बेडमध्ये ठेवलेले रोख दीड लाख रुपये व १५ तोळे सोने असा सुमारे १२ लाख रुपयांचा मुद्देमाल लंबविला. चोरट्याने घरातील सामान अस्ताव्यस्त केले आहे. ठाकरे यांना आपल्या घरात चोरी झाल्याचा प्रकार आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी सांगितल्यावर ते नाशिकहुन तात्काळ घरी पोहचले. या घटनेची खबर त्यांनी देवळा पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनस्थळी धाव घेऊन पंचनामा केला.(Nashik Crime)

Deola Crime | शहरात अश्लील चाळ्यांसाठी चालणाऱ्या कॅफेवर पोलिसांनी टाकली धाड

भर वस्तीत व दिवसा हि धाडशी घरफोडी झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, चोरटा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. देवळा तालुक्यात गेल्या काही महिन्यांत अनेक चोरीच्या घटना घडल्या असून, या प्रकरणांचा छडा लावण्याचे आव्हान देवळा पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. पोलिसांनी याची कसून चौकशी करून या चोरट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी देवळा शहर व उपनगरातील नागरिकांनी केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here