
Deola Collage : यवतमाळ येथे दिनांक 27 ते 29 मार्च रोजी होणाऱ्या महाराष्ट्र राज्य बॉल बॅडमिंटन 19 वर्ष वयोगट स्पर्धेसाठी नाशिक ,धुळे, जळगाव,व नंदुरबार या विभागातून विजयी झालेले देवळा महाविद्यालयाचे संघ पात्र ठरले आहेत. या स्पर्धेत मुलांच्या संघातून, कार्तिक शेवाळकर, निलेश भदाणे, हितेश शेवाळे , उमेश गायकवाड, शुभम पवार, रोहित मोरे तर मुलींच्या संघातून कु. साक्षी आहेर, कु. मोहिनी गायकवाड, कु. रोहिणी गायकवाड, कु. प्रांजल बच्छाव, कु. पुनम पवार कु. केजल पाटील व इतर खेळाडू सहभागी होणार आहेत. (Deola Collage )

Rain alert: अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर संकटाच वादळ…!
बोदवड येथील विभागीय स्पर्धेत हे दोघेही संघ विजयी होऊन ते राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र झाले आहेत. या पात्र संघाच्या खेळाडूंचे संस्थेच्या प्रशासकीय अधिकारी डॉ. मालती आहेर , प्राचार्य हितेंद्र आहेर, उप प्रचार्य प्रमोद ठाकरे यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या खेळाडूंना श्री तुषार देवरे, दिलीप गुंजाळ ,मनीष देवरे यांचे मार्गदर्शन लाभले . राज्यस्तरीय स्पर्धेसाठी नाशिक विभागाचे मुलांचे संघ व्यवस्थापक म्हणून .तुषार देवरे तर मुलींचे संघ व्यवस्थापक म्हणून नितीन आहेर हे काम बघतील.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम