सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | सी. ए (चार्टड अकाऊंटंट) या अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या परीक्षेचा अंतिम वर्षाचा निकाल गुरुवारी (दि. ११ ) रोजी जाहिर झाला असून, या परीक्षेत देवळा तालुक्यातील सरस्वतीवाडी येथील ज्ञानेश्वर साहेबराव मेधने या विद्यार्थ्याने घवघवीत यश मिळवले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द व जिकाटीच्या जोरावर ग्रामीण भागातील विध्यार्थी ज्ञानेश्वर मेधने याने सीए च्या अंतिम वर्षात यशाला गवसणी घातल्याने त्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.आई वडिलांनी मोलमजुरी करून ज्ञानेश्वरला बी.कॉम पर्यंतच्या पदवीपर्यंतचे शिक्षण दिले.
Deola | महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे देवळा तहसील कार्यालय येथे आंदोलन
त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण ग्रामीण भागातच झाले असून, पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दुर्दैवाने पितुछत्र हरपले. ह्या दुःखातून सावरत त्याने आपला शैक्षणिक प्रवास चालू ठेवला. मध्यंतरी खासगी नोकरी करून आईला घर प्रपंचासाठी हातभार लावत पुढे त्याने नोकरी सांभाळून सी.ए. होण्याचा निर्णय घेतला. या शिक्षणासाठी आर्थिक परिस्थिती नसतांना विना क्लास जिद्द व चिकाटीच्या जोरावर त्याने हे यश संपादन केले आहे. त्याला आई, दोन विवाहित बहिनी, मेव्हणे यांचाही खूप मोठा हातभार लाभला. श्री. पिंपळेश्वर पतसंस्थेचे संस्थापक राजेंद्र आहेर यांचा ज्ञानेश्वर हा शालक असून, त्याचे ह्या यशाबद्दल कौतुक करण्यात येत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम