Deola | माळवाडी येथील महात्मा फुले क्रीडा मंडळाचा जिल्हा रुग्णालयाच्या वतीने सन्मान

0
39
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | माळवाडी येथील महात्मा फुले क्रीडा मंडळ सातत्यपूर्ण रक्तदान शिबिर आयोजित करत असल्याबद्दल जिल्हा रुग्णालयाच्या वतीने मंडळाला उत्कृष्ट रक्तदाता शिबिर आयोजक म्हणून सन्मानित करण्यात आले. माळवाडी (ता.देवळा) येथे मंडळाच्या वतीने दरवर्षी 28 नोव्हेंबरला महात्मा फुले पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबीर आयोजित करत असते. याप्रसंगी मंडळाचे सर्व सदस्य, तसेच गावातील तरुण नागरिक, विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने रक्तदान शिबिरात भाग घेतात.

Deola | वसाका विक्री न करता भाडे करारावर द्यावा; आ. आहेरांसह शिष्टमंडळाची अजित पवारांकडे मागणी

दरवर्षी शंभरापेक्षा जास्त रक्तदाते भाग घेतात. हा एक आदर्श तालुक्यातून निर्माण झाला आहे. त्याबद्दल मंडळाच्या सदस्यांना सिव्हिल सर्जन डॉ. चारूदत्त शिंदे, डॉ.सुप्रिया अहिल्या, रक्त संक्रमण अधिकारी डॉ.पुरुषोत्तम पूरी, समन्वयक मंगेश राठोड यांच्या हस्ते नुकतेच सन्मानित करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष साहेबराव बागुल, सचिव जयराम सोनवणे, मार्गदर्शक यशवंत जाधव, सदस्य मनोज बच्छाव, पंकज बागुल, सागर बागुल, आदित्य जाधव आदी उपस्थित होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here