Deola | फुले माळवाडी येथे लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी शिबिराचे आयोजन

0
24
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  तालुक्यातील फुले माळवाडी येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नाव नोंदणी व अर्ज ऑनलाईन, ऑफलाइनची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली पाहिजे. यासाठी सरपंच लंकेश बागुल यांनी गावात शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराला शुक्रवारी आमदार डॉ. राहुल आहेर, माजी. उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर, अतुल पवार, गटविकास अधिकारी भरत वेंदे आदींनी भेट देऊन या योजनेच्या जनजागृतीबाबत समाधान व्यक्त केले.

Deola | माळवाडी येथील महात्मा फुले क्रीडा मंडळाचा जिल्हा रुग्णालयाच्या वतीने सन्मान

तसेच सरपंच लंकेश बागुल यांनी स्वखर्चाने गावात जेवढी लोकसंख्या आहे. तितके वृक्ष लागवड केले आहे. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे आमदार डॉ. आहेर यांनी कौतुक केले. गावात राबविण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या शिबिराला अंगणवाडी सेविका, बचत गट, सीआरपी, मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. यावेळी सर्व ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here