भाजपच्या वतीने देवळ्यात पदवीधर नाव नोंदणी अभियान

0
22
देवळा येथे भाजपच्या वतीने आयोजित पदवीधर मतदार नोंदणी अभियान प्रसंगी उपस्थित तालुका अध्यक्ष किशोर चव्हाण,उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर ,अतुल पवार , नायब तहसीलदार विजय बनसोडे आदी (छाया - सोमनाथ जगताप )

देवळा : येथे भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पदवीधर मतदार नाव नोंदणी अभियान सुरू केले आहे. या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पदवीधरांनी याचा लाभ घेऊन आपली नाव नोंदणी करून घ्यावी ,असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे देवळा तालुका अध्यक्ष किशोर चव्हाण यांनी केले आहे.

देवळा येथे भाजपच्या वतीने आयोजित पदवीधर मतदार नोंदणी अभियान प्रसंगी उपस्थित तालुका अध्यक्ष किशोर चव्हाणउपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर अतुल पवार नायब तहसीलदार विजय बनसोडे आदी छाया सोमनाथ जगताप

पदवीधर मतदार संघासाठी नाव नोंदणीसाठी ७ नोव्हेंबर अखेरची मुदत असून , 1 नोव्हेंबर 2022 रोजी पदवी किंवा पदवीकाला तीन वर्षे पूर्ण झालेले असेल असे पदवीधर मतदार यादी साठी नाव नोंदणी करू शकतात. सदर नाव नोंदणी करण्यासाठी अर्ज 18 कॅम्पात उपलब्ध आहे. सोबत पदवी किंवा पदविकाचे प्रमाणपत्राची झेरॉक्स राजपत्रित अधिकारी यांच्याकडून अटेस्टेड किंवा नोटरी करणे आवश्यक आहे. तसेच रहिवासी पुरावा म्हणून कागदपत्र (आधार, मतदान ओळखपत्र, लाईट बिल, ड्रायव्हिंग परवाना) देणे आवश्यक आहे.

सदर कागदपत्र हे स्वयं साक्षांकित करून सदर अर्ज देवळा येथे पाच कंदील परिसरात भाजपने सुरू केलेल्या अभियान केंद्रात जमा करावा. यावेळी नायब तहसीलदार विजय बनसोडे ,तालुका अध्यक्ष किशोर चव्हाण , उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर, माजी उपनगराध्यक्ष अतुल पवार ,नगरसेवक अशोक आहेर ,पवन अहिरराव ,भाऊसाहेब आहेर ,मंडळ अधिकारी हिरे , सतीश बच्छाव ,शेखर आहेर ,मनोज सोनार ,बी एस दंडगव्हाळ , मिलिंद गैवरे ,अरुण तिरमले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here