Deola : देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी सर्व समावेश अशा शेतकरी विकास पॅनलचे योगेश आहेर व उपसभापती पदी अभिमन पवार यांची आज मंगळावर दि २३ रोजी बिनविरोध निवड करण्यात आली . नूतन पदाधिकारी निवडीसाठी प्राधिकृत अधिकारी सुजय पोटे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी १० वाजता संचालक मंडळाची बैठक बोलविण्यात आली .
सभापती पदासाठी योगेश शांताराम आहेर व उपसभापती पदासाठी अभिमन वसंत पवार यांचा निर्धारित वेळेत प्रत्येकी एक एक अर्ज प्राप्त झाल्याने प्राधिकृत अधिकारी सुजय पोटे यांनी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले .सभापती योगेश आहेर यांच्या अर्जावर सूचक म्हणून भाऊसाहेब पगार ,तर अनुमोदक म्हणून धनश्री आहेर यांनी स्वाक्षरी केली तर उप सभापती यांच्या अर्जावर सूचक म्हणून दिलीप पाटील यांनी तर अनुमोदक म्हणून शाहू शिरसाठ यांनी स्वाक्षरी केली .
याप्रसंगी पॅनलचे नेते व माजी सभापती केदा आहेर संचालक सर्वश्री विजय सोनवणे, शिवाजी पवार,शिवाजी आहिरे, अभिजित निकम,विशाखा पवार,दीपक बच्छाव, रेशमा महाजन ,भास्कर माळी, शीतल गुंजाळ ,संजय शिंदे,निंबा धामणे ,भावराव नवले ,सचिव माणिक निकम आदी उपस्थित होते . यावेळी नवनिर्वाचित सभापती योगेश आहेर यांनी सर्व संचालक मंडळाचे आभार मानले .सत्कार करण्यात आला . निवड घोषित होताच समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत जल्लोष केला. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम