Deola bajar sameeti : गेल्या काही दिवसांपासून आपण देवळा बाजार समितीचा प्रवास बघत आलो. मात्र या प्रवासात राजकीय नेत्यांच्या कुरघोड्या बघितल्यात. आज आपण बाजार समितीमधील महत्वाचा असा रोख पेमेंटचा विषय बघूया जेणेकरून हा लढा किती महत्वाचा होता हे आपल्या देखील लक्षात येईल. हा विषय काय आहे हेच शेतकऱ्यांना माहिती नव्हते तेव्हा रोख पेमेंटसाठी उदयकुमार आहेर यांनी आंदोलन उभारले. याच वेळी बाजार समितीत सभापती म्हणुन व्यापारी नको ही भूमिका घेवून राळ उठवून दिली होती.
Deola Bajar sameeti election: देवळा बाजार समिती निर्मिती ठरली तालुक्याच्या राजकारणाची ठिणगी
जिल्ह्यात पिंपळगाव, लासलगाव आणि देवळा या बाजार समिती कांद्यासाठी प्रमुख बाजारपेठ म्हणुन ओळखल्या जात. देवळा बाजार समिती ही अतिशय महत्वाची आणि विश्वासू बाजार समिति म्हणुन शेतकरी वर्गांमध्ये त्याकाळी लोकप्रिय ठरली. कळवण बाजार समिती असताना देवळा ही उपबाजार समिती होती. यावेळी चांदवड, सटाना, उमराणे कळवण या बाजार समितीत कांदा व्यापार येण्या आधीपासूनच देवळा येथे या पंचक्रोशीतील शेतकरी कांदा विक्रीसाठी घेवून येत असे. कालांतराने कांदा व्यापार जवळपास सर्वच मार्केट मध्ये वाढल्याने देवळा शहरात येणारा कांदा हा कमी झाला. सध्याच्या परिस्थितीचा विचार केल्यास देवळा पेक्षा उमराणे बाजार समितीत कांदा जास्त येतोय. मग हे बाजार समितीत सत्तेवर असलेल्या नेत्यांचे यश की अपयश याचा विचार पुढाऱ्यांसह शेतकऱ्यांनी करावा या वादात मीडिया महाणून आम्ही काही पडत नाही. Deola bajar sameet
शेतकऱ्यांचा कांदा तर विकला जात होता, मात्र त्यांना कुठेही रोख पेमेंट दिले जात नव्हते. खर म्हणजे भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांना असे वाटायचे कि व्यापारी आपल्याकडून कांदा घेतात ते इतर व्यापऱ्यांना विकता तेव्हाच आपल्याला त्यातून पैसे देतात. व्यापारी देखील आपल्या सारखे निरागस आणि गरिब आहेत असा भोळ्या शेतकऱ्यांचा भाबडा विश्वास होता. अर्थात व्यापारी निरागस असतात याच्यावर आपण शंका घेणे उचीत नाही. यावेळी जन आंदोलन उभे राहणे गरजेचे होते. मात्र त्यासाठी मुरलेले पुढारी पुढे येण्यास तयार नव्हते. व्यापारीच सत्तेत असल्याने हा विषय बारगळला. शेतकऱ्यांना यावेळी रोख पेमेंट हवे असल्यास २ किंवा ३ रुपये टक्क्याने रक्कम कापली जात होती. आडत, हमाली, आणि त्यात या टक्केवारीची भर शेतकऱ्यांची पिळवणूक करत होती. शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशाचा काही व्यापऱ्यांकडून असा गैरवापर होत होता. Deola bajar sameet
कळवण बाजार समिती असतांना देवळा उपबाजार समिती होती. त्यावेळी नाशिकचे डीडीआर विजय सूर्यवंशी हे होते. यांना उदयकुमार आहेर यांनी शेतकऱ्यानसंमवेत बैठकीची गळ घातली. आहेर यांच्या आग्रही भूमिकेनंतर व्यापारी, शेतकरी, आणि प्रशासनाची बैठक झाली. मात्र यात तोडगा काही निघाला नाही. व्यापाऱ्यांनी जुमानले नाही. यामुळे संतप्त झालेल्या उदयकुमार आहेर यांच्यासह सुनील उर्फ गोटू आबा आहेर, कुबेर जाधव, प्रवीण मेधणे, विजय आहेर (डॅशिंग आबा), मनोज शांताराम अहिरराव, आबा खैरणार, अतुल आहेर, विलास मेधने, कनकापूरचे बापू शिंदे ,भाऊसाहेब आहेर, यांच्यासह तालुक्यासह सटवाईवाडीचे असंख्य शेतकऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. शेतकऱ्यांना रोख पेमेंट मिळावे म्हणुन उपोषण, आंदोलने सुरू केलीत. पाच ते सहा वेळा उपोषण केले. देवळा शहरात कडकडीत बंद देखील अनेक वेळा पाळण्यात आला. शेतकरी विरुद्ध व्यापारी संघर्ष उभा राहतो कि काय असे चित्र निर्माण झाले. SRPF चा बंदोबस्त देखील देवळा शहरात तैनात करण्यात आला. तसेच आजूबाजूचे तालुक्यातील पोलिस बंदोबस्त देवळा शहरात तैनात झाल्याने शहराला छावणीचे स्वरूप आले होते. हे आंदोलन हाणून पाडण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये रोख पेमेंटचे तोटे काय असतील याच्या अफवा पसरवून फुट पाडण्याचा देखील प्रयत्न झाला. जवळपास ४ ते पाच वर्ष हा संघर्ष असाच सुरू होता. अनेकवेळा शेतकऱ्यांचे पैसे व्यापाऱ्यांनी बुडविल्याचे देखील समोर आले. अद्याप देखील ते पैसे मिळाले नाहीत. तेव्हा रोख पेमेंट हा विषय किती गरजेचं आहे. यावर विचार मंथन होवून अखेर हा विषय राज्य पातळीवर जात आज जवळपास सर्वच बाजार समितीत शेतकऱ्यांना रोख पेमेंट मिळायला लागले. हाच निर्णय देवळा बाजार समितीने देखील लागू केला. अशा पद्धतीने हे देवळा बाजार समिती मधील आंदोलन चालले. विशेष म्हणजे या आंदोलनात राहुल आहेर, केदा आहेर किंवा योगेश आहेर हे कधीही रस्त्यावर उतरले नाही हे विशेष आहे. Deola bajar sameet
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम