Deola | देवळा येथील आहेर महाविद्यालयात ‘आंतर विभागीय बॉल बॅडमिंटन स्पर्धा’

0
10
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | देवळा येथील ‘कर्मवीर रामरावजी आहेर’ महाविद्यालयात रविवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत ‘आंतर विभागीय बॉल बॅडमिंटन’ मुले व मुली या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेसाठी पुणे विद्यापीठातून शिवाजी उत्तेकर कक्षाधिकारी विद्यापीठ क्रीडा मंडळ, हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते. या स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर यांच्या हस्ते करण्यात आले. पुणे शहर, पुणे ग्रामीण, अहमदनगर आणि नाशिक, येथील चार मुलांचे आणि चार मुलींचे संघ आले होते. मुलांच्या संघात नाशिक विभाग संघाने विजय मिळवला. तर, पुणे ग्रामीण हा विभाग उपविजयी ठरला.(Deola)

Deola | ‘मविप्र’ तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत पिंपळगाव विद्यालयाचे यश…

मुलींच्या संघात पुणे ग्रामीण संघाने विजय मिळविला तर नाशिक विभागाचा मुलींचा संघ उपविजयी झाला. मुलांच्या संघातून किरण भामरे, सौरभ गुंजाळ, किशोर खैर, ऋतिक सोनवणे, प्रशांत जाधव, हितेश आहेर हे खेळाडू उत्कृष्ट खेळले. तर मुलींच्या संघातून प्रतीक्षा आहेर, प्रियंका सोनवणे, काजल ठमे, मोहिनी गायकवाड, ज्योती सोनवणे व साक्षी आहेर यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. (Deola)

दरम्यान, या स्पर्धेसाठी पंच म्हणून यज्ञेश आहेर, दिलीप गुंजाळ, तुषार पगार, प्रा.तुषार देवरे, निलेश भालेराव, पोपट सोनवणे, यांनी काम पाहिले. विजयी खेळाडूंचे प्राचार्य, डॉ. हितेंद्र आहेर, संस्थेच्या सचिव, डॉ.मालती आहेर, डॉ.जयवंत भदाणे, प्रमोद ठाकरे यांनी विजयी संघांचे अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.(Deola)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here