देवळा येथे आनंद ऍग्रो सेंटर मध्ये प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राचे लोकार्पण

0
15
देवळा / येथे प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याचा ऑनलाईन कार्यक्रम बघतांना उपस्थित शेतकरी वर्ग व कृषी विभाचे अधिकारी ,कर्मचारी आदी ( छाया -सोमनाथ जगताप )

देवळा : देवळा येथे आनंद ऍग्रो सेंटर मध्ये प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राचे लोकार्पण झाले . ह्या ऑनलाईन कार्यक्रमास शेतकऱ्यांनी हजेरी लावली . शेतकऱ्यांना बी बियाणे ,औषधे ,अवजारे ,खते आदी सेवा सुविधा एकाच जागी उपलब्ध होण्यासाठी प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र सुरु करण्यात येत आहे . या योजनेचे उदघाटन आज दि २७ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले . याप्रसंगी ८. ५ कोटी पीएम किसान लाभार्थ्यांना १४ व्या हप्त्याचे हस्तांतरण करण्यात आले .

देवळा येथे प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याचा ऑनलाईन कार्यक्रम बघतांना उपस्थित शेतकरी वर्ग व कृषी विभाचे अधिकारी कर्मचारी आदी छाया सोमनाथ जगताप

यानिमित्ताने सकाळी ११ वाजता मोदी यांनी शेतकऱ्यांशी ऑनलाईन सुसंवाद साधला .यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष किशोर चव्हाण , माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक जितेंद्र आहेर ,जगदीश पवार , पुंडलिक आहेर , चंद्रकांत चव्हाण , विशाल मिरजे , रामा पाटील , महेंद्र आहेर ,दिनकर आहेर , उत्तम आहेर , जितेंद्र पवार ,बापू पवार , मोठाभाऊ पवार , संजय पवार , किरण आहेर , प्रकाश पवार , हेमराज पवार , हर्षद मोरे आदी शेतकऱ्यांसह ,तालुका कृषी अधिकारी संजय वाघ ,दीपांजली भामरे ,मनीषा जाधव , वैशाली पवार , पंकज परदेशी ,व्ही डी खैर उपस्थित होते .


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here