Deola | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व शालेय साहित्य वाटप

0
30
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘जन विश्वास सप्ताह’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमा अंतर्गत शुक्रवारी दि.२६ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व शालेय साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.चे माजी सदस्य यशवंत शिरसाट होते. तर, प्रमुख पाहुणे म्हणून प्रांतिक सदस्य व विधानसभा अध्यक्ष योगेश आहेर, जिल्हा उपाध्यक्ष जगदीश पवार, नगरसेवक संतोष शिंदे आदींसह शेतकी संघाचे अध्यक्ष संजय गायकवाड, संचालक कैलास देवरे, डॉ.किरण आहेर, शरद आहेर, बंडू परदेशी आदी उपस्थित होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here