Deola | चिंचवे गावाजवळ स्कूल बसला कारची धडक; एक ठार, तीन गंभीर जखमी

0
6
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | मुंबई आग्रा महामार्गावरील चिंचवे शिवारात शुक्रवार (दि. ३१) रोजी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या स्कुलबसला स्विफ्ट कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी झाले आहेत. त्यातील एक गंभीर जखमी असल्याने पुढील उपचारासाठी त्याला धुळे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुंबई आग्रा महामार्गावरील देवळा तालुक्यातील चिंचवे येथील जिओ पेट्रोल पंपासमोर शुक्रवार (दि.३१) रोजी सकाळी धूळ्याकडून नाशिकच्या दिशेने भरधाव वेगाने जात असलेल्या स्विफ्ट कारने (जीजे १५ सीजे ७३०३) चांदवडकडे जाणाऱ्या व रस्त्यांच्या कडेला उभ्या असलेल्या स्कुलबसला (एम.एच.१५ एके १६७९) पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला. धडक इतकी भीषण होती की यामध्ये कारचा अर्धा भाग बसच्या मागील टायरपर्यंत दाबला गेल्याने कारचा समोरील भाग चक्काचूर झाला.

Deola | सुनिल आहेर खाजगी कृषी मार्केटमधून कांदा खरेदी करणार विदेशातील कंपनी

या अपघातात भरत पुंडलिक घोडके (रा. बोरकुंड ता. धुळे) ही व्यक्ती मयत झाली आहे. तर स्वप्निल शिवाजी बच्छाव (रा. डाबली ता. मालेगाव) शेख अझर जनाउद्दिन (वय २५) (रा. तामापूर जि. जळगाव) हे दोन्ही जखमी असून त्यांच्यावर चांदवड व मालेगाव येथे उपचार सुरू आहेत. तर मनोज शिवाजी गडरे (रा. बोरकुंड ता. धुळे) याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या अपघातप्रसंगी बसमध्ये बसलेले शालेय विद्यार्थी थोडक्यात बचावले असुन सुदैवाने पुढिल मोठा अनर्थ टळला. परिसरातील नागरिकांनी जखमींना बाहेर काढुन मदतकार्य सुरू करत जखमींना जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या व सोमा कंपन्नीच्या रुग्णवाहिकेतुन पुढील उपचारासाठी चांदवड येथे रवाना केले. या घटनेबाबत देवळा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here