Skip to content

Dada bhuse with Onian farmer’s: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या ‘या’ मागण्या मान्य; पालकमंत्री दादाजी भुसेंच्या शिष्टाईला यश


Dada bhuse with Onian farmer’s: गेल्या काही दिवसांपासून शेतकरी रस्त्यावर उतरला यामुळे कांद्याचे व्यवहार ठप्प झाले होते. परिस्थिती चिघळत असताना मंत्री दादाजी भूसे यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूने ठाम पणे उभे राहत भूमिका घेतली. यामुळे शेतकऱ्यांना आज मोठा दिलासा मिळाला शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या मान्य झाल्याने मंत्री दादाजी भुसे यांची भूमिका पुन्हा शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्वाची ठरल्याचे अधोरेखित झाले.

मंत्री भारती पवार आ. आहेर राजीनामा द्या; शेतकऱ्यांनी फटकारले

आज दि. 24.08.2023 रोजी नाशिक जिल्हयातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे आवारावर कांदा शेतमालाचे लिलाव सुरु झाल्या नंतर कांदा शेतमाल सरासरी रु.1900 ते 2000 प्रति क्विंटल बाजारभावाने विक्री झालेला होता. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आज कांदा लिलाव बंद पाडले. याची दखल घेवून मंत्री दादाजी भुसे यांनी जिल्हाधिकारी, नाफेडचे प्रतिनिधी व N. C. C. F. च्या प्रतिनिधींशी बोलून तोडगा काढला त्यानुसार रात्री उशिरा जिल्हाधिकारी यांनी पत्रक काढून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

शेतकरी व शेतकरी संघटना प्रतिनिधी यांनी कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे आवारावर नाफेड व N. C. C. F. मार्फत कांदा खरेदी केंद्र सुरु करावे. तसेच बाजार समित्यांमध्ये नाफेड ने जाहीर केलेला रु.2410/- प्रति क्विंटल बाजार भावाने कांदा खरेदी करावा अशी मागणी करुन बाजार समितीतील कांदा लिलाव आज बंद पाडल्यानंतर नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून तातडीने शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करून निर्णय घेण्याच्या सूचना केल्या होत्या त्या नुसार आज रात्री उशिरा जिल्हाधिकारी यांनी शासन आदेश काढून नाशिक जिल्हयातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे आवारावर नाफेड व N. C. C. F. अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्यामार्फत कांदा खरेदी केंद्र सुरु करून ज्या शेतकरी उत्पादक कंपन्यामार्फत बाजार समिती आवारावर कांदा खरेदी करणार नाहीत त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

कांदा आंदोलनाबाबत भूमिका घेताना नेत्यांची गोची झाल्याचे एका बाजूला बघत असताना दुसऱ्या बाजूला मात्र दादाजी भुसे यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे राहुल कांदा खायला ज्यांना परवडत नसेल त्यांनी खावू नका अशी रोखठोक भूमिका घेवून महागाईवर बोलणाऱ्यांना चांगलच खडसावले. आज देखील ही कोंडी सोडविण्यासाठी मंत्री भुसे हे आग्रही असल्याने रात्री उशिरा पत्रक निघाले. (Dada bhuse with Onian farmer’s)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!