Crime news | मौलानाने मशिदीत चिमुकलीवर केले अत्याचार

0
27
Rape Case
Rape Case

Crime news |  कुरारा ह्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात माणुसकीला काळीमा फसणारी घटना उघडकीस आली आहे. मशिदीसारख्या पवित्र ठिकाणी एका ११ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला असल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, ह्या क्रूर घटनेतील गुन्हेगार हा दुसरा कोणीही नसून मशिदीचा मौलाना हाच आहे.

ही पीडित अल्पवयीन मुलगी उर्दू भाषा शिकण्यासाठी त्या मशिदीत आलेली होती. दरम्यान, यावेळी ह्या प्रकरणी आरोपी असलेल्या मशिदीच्या मौलानाने तिला शिकार बनवले. पीडित मुलीने घरी येऊन आपल्यावर झालेला प्रकार सांगितल्यावर संबंधित पीडितेच्या  काकांनी त्या आरोपी मौलानाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. कुरारा पोलिसांनी ह्या आरोपी असलेल्या क्रूर मौलानाला ताब्यात घेतलेले आहे. पीडित अल्पवयीन मुलगी ही बुधवारी सकाळी सात वाजताच घरातून मशिदीमध्ये उर्दू शिकण्यासाठी गेलेली होती.(Crime news)

Crime news | पैसे नसल्याने आई हतबल, दोन मुलींसह ट्रेन खाली संपवलं आयुष्य

तेथे मशिदीचा आरोपी मौलाना मुंतझीर आलम हा रहिवासी- पुनिया जिल्हा, राज्य- बिहार याने तित्या मुलीला फूस लावून मशिदीच्या आतील खोलीत नेले. तेथे त्या मौलानाने पीडित मुलीला धमकावत तिच्यावर बलात्कार केला तसेच कोणाला काही सांगितल्यास तिला जीवे मारण्याची धमकीदेखील दिली. पीडिते मुलीच्या काकांनी असे सांगितले की, भाची ही तिच्या १० वर्षांच्या भावासोबत संबंधित मशिदीत गेलेली होती. मौलानाने तिच्या भावाला बाहेर अभ्यास करण्यासाठी बसवले आणि मुलीला मशिदीच्या आतील खोलीत नेले.(Crime news)

Raj Thackeray | राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला; कारण गुलदस्त्यात

दरम्यान, ह्या प्रकरणातील संबंधित आरोपीच्या विरुद्ध पॉक्सो ह्या कायद्यांतर्गत बलात्काराचा व अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ह्या गावातील गावकऱ्यांच्या सांगितल्यानुसार, या प्रकरणातील आरोपी असलेला मौलाना हा चार-पाच वर्षांपूर्वी बिहार राज्यामधून ह्या गावातील संबंधित मशिदीत आलेला होता. येथे तो गावातील मुस्लिम समाजातील मुलांना धर्माचे व उर्दू भाषेचे शिक्षण देत असत. ह्या गावात राहणाऱ्या गावकऱ्यांच्या संमतीनेच त्या मौलानाला ह्या गावातील मशिदीत ३० हजार रुपये महिना असा पगार देत  गावातील मुस्लिम समाजातील मुलांना धर्माचे व उर्दू भाषेचे शिक्षण देण्यासाठी ठेवलेले होते.(Crime news)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here