Corona Update | कोरोनाचा वाढता कहर; नवीन व्हॅरियंटने घेतला तिघांचा बळी

0
27
Coronavirus
Coronavirus

Corona Update | 2020 पासून जगभरात कहर करणाऱ्या कोरोनाने विश्रांती घेतली असं वाटत असतानाच आता पुन्हा एकदा कोरोनाचा नवा व्हेरियंट पुन्हा लोकांचे बळी घेऊ लागला आहे. भरातात 2020 पासून कोरोनाचे रुग्ण आढळण्यास सुरूवात झाली होती यातच भारतात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता देशात मार्च 2020 मध्ये लॉकडाऊन करण्यात आला होता. दरम्यान, त्यानंतर भारतातील कोरोनाचा प्रभाव कमी होत असतानाच आता पुन्हा कोरोनाच्या ओमिक्रॉनच्या नव्या सब-व्हेरियंट JN.1 चा भारतात प्रसार सुरु झालेला आहे.

सर्वात प्रथम चीन मग सिंगापूर आणि आता भारतात या कोरोनाच्या नवीन व्हेरियंटच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत असून यामुळे सध्या भारतीय आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. यातच एक धक्कादायक बाब समोर आली असून कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटमुळे कर्नाटकमधील तिघांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या २४ तासांत ११५ नवीन रुग्ण सापडले असून महाराष्ट्रातही नवीन व्हेरियंटचे दहा रुग्ण आढळले आहे.

Datta Jayanti | दत्तात्रेय महाराजांचा जन्म कसा झाला ?; वाचा सविस्तर

Corona Update | कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे तिघांचा मृत्यू

कोरोना भारतात नष्ट होतोय असं वाटत असतानाच कोरोनाने पुन्हा एकदा आपला प्रसार वाढवण्यास सुरूवात केली असून कोरोनाचा नवीन उपप्रकार जेएन 1 व्हेरिएंट हा सध्या त्रासदायक ठरण्याची चिन्ह दिसत आहे. त्यामुळे भारतातील आरोग्य यंत्रणा ही सज्ज होत असून भारतात JN.1 रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दरम्यान, राज्यासह देशाच्या वेगवेगळ्या भागात JN.1 या नवीन व्हेरियंटचे बाधित रुग्ण आढळत असून सोमवारी २५ डिसेंबर रोजी कर्नाटकमध्ये ३४ नव्या जेएन १ बाधित रुग्णांची नोंद करम्यात आली तर त्यात तीन रुग्णांचा मृत्यूही झाला आहे.

Sucide News | प्रेयसीच्या शॉपिंगच्या हट्टामुळे तरूणाने उचललं टोकाचं पाऊल

भारतीताल कोरोनाच्या या नविन व्हेरियंट पहीला रुग्ण हा केरळमध्ये आढळला असून सध्या केरळमध्ये रोज शेकडो करोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. दरम्यान, सोमवारी केरळमध्ये ११५ नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत. कर्नाटक राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात JN.1 चे ३४ रुग्ण आढळले असून यापैकी २० रुग्ण एकट्या बंगळुरू शहरात सापडलेत तसेच यात तीन रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here