Corona News | कोरोनाच्या नव्या व्हेरीऐंटमुळे आवाज जाणार..?

0
11
Coronavirus
Coronavirus

Corona News |   कोरोना ह्या भयानक महामारीने भारतासह संपूर्ण जगभरात थैमान घातले होते. त्यानंतर ह्या आजारचे वेगवेगळे व्हेरीऐंट्समुळे आरोग्यविषयक अनेक गंभीर समस्या ह्या समोर आल्याचे आपण बघितले. मात्र, आता ह्या कोरोनाचा धोका हा जागतिक स्तरावर पुन्हा एकदा  वाढल्याचे वृत्त येत आहेत. ओमिक्रॉनच्या ह्या नवीन JN-1 ह्या सब- व्हेरीऐंटमुळे जागतिक स्तरावर चीन, सिंगापूर, भारत आणि यासह इतरही देशांमध्ये ह्या नव्या संसर्गाच्या केसेस वाढत आहेत. (Corona News)

ओमिक्रॉनचा JN-1 हा नवा सब-व्हेरियंट हा जास्त घातकी नसल्याचे डॉक्टरांकडून सांगितले जात आहे. पण नवीन संशोधनानुसार JN-1 ह्या संसर्गाने बाधित झालेल्या व्यक्तीला चव व वास कळत नाही. मात्र, ह्या व्यक्तीच्या घशाचा आवाज हादेखील कायम स्वरूपी गमावला जाण्याची शक्यता असल्याची धक्कादायक माहितीदेखील आता समोर येत आहे.

सध्या देशासह राज्यात वेगाने पसरत असलेल्या कोरोनाच्या ह्या नव्या सब-व्हेरियंट JN-1 मुळे अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. आणि याचमुळे नागरिकांनी आधीपेक्षा जास्त सावधगिरी बाळगण्याचा सल्ला हा शास्त्रज्ञांनी व डॉक्टरांनी दिला आहे. (Corona News)

Corona Alert | वाढत्या कोरोनामुळे पुन्हा मास्क वापरण्याचा सल्ला..!

काय आहेत निष्कर्ष? | (Corona News)

शास्त्रज्ञ हे अभ्यासाच्या निष्कर्षात म्हणतात की, ज्या रुग्णांना अस्थमा किंवा न्यूरोलॉजिशी संबंधित काही समस्या आहेत त्या व्यक्तींना ह्या नव्या व्हेरियंटचा जास्त धोका असेल. दरम्यान, यासाठी उपचार करताना न्यूरोलॉजी, मानसोपचार इत्यादी बाबींकडे अधिक काळजीपूर्वक लक्ष देणे हे तितकेच गरजेचे आहे. तसेच हा आजार फक्त श्वसनाच्या संसर्गापुरता मर्यादित नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे. (Corona News)

Nashik Corona Alert | कोरोनाचं जोरदार पुनरागमन; आरोग्य यंत्रणा ॲक्शन मोडवर

संशोधनातून हीदेखील माहिती समोर आली आहे की, किशोरवयीन मुलांच्या ‘व्हॉइस बॉक्स’ म्हणजेच स्वरयंत्रातील दोन व्होकल कॉर्ड ज्यामुळे आपण बोलू शकतो. यामध्ये काही समस्या असल्याचेही आढळून आले आहे. आधीच अस्थमाची समस्या असलेल्या मुलांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. तसेच कोविडमुळे मज्जासंस्थेवर होणाऱ्या काही दुष्परिणामांमुळे व्होकल कॉर्ड पॅरालिसिस देखील होऊ शकते. असे अनेक प्रकार ह्या संशोधनातून समोर आले आहेत.

कोविडचा संसर्ग सुरू झाल्यापासून ज्येष्ठ व्यक्तींमध्ये ही समस्या यापूर्वीही नोंदवली होती. मात्र, किशोरवयीन मुलामध्ये व्होकल कॉर्ड पॅरालिसिसची ही पहिलीच घटना संशोधनातून आढळून आली. दरम्यान, त्यामुळे शास्त्रज्ञांनी जास्त काळजी घेण्यासाठी सांगतले आहे. ह्यावेळी शास्त्रज्ञांनी ‘व्होकल कॉर्ड पॅरालिसिस’ हा व्हायरसचा पुढील टप्पा असू शकतो अशी शक्यता वर्तविली आहे. (Corona News)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here