conversion : बायबलच्या माध्यमातून त्या करत होत्या धर्मपरिवर्तनाचा प्रयत्न…

0
59

conversion : पुण्यातील पिंपरी चिंचवड शहरातील रहाटणी मध्ये धर्मप्रसाराचा प्रकार उघडकीस आला आहे. ख्रिश्चन समाजाच्या तीन महिलांवर मन परिवर्तन करत असल्याचा आरोप करत वाकड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या महिलांनी आम्हाला मारहाण करण्यात आली अशी परस्पर विरोधी तक्रार पोलिसात केली आहे.

 

रहाटणी परिसरातील एका कुटुंबाच्या घरी तीन महिला जाऊन त्यांना बायबल वाचून दाखवायच्या, बायबलचा अर्थ समजावत असताना त्यांचं मन परिवर्तन करत होत्या. येशू ख्रिस्तांवर विश्वास ठेवा, बायबल वर विश्वास ठेवा असं म्हणत या महिला धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे. सोमवारी हा प्रकार समोर आल्यावर वाकड पोलिसात तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रूट कामटे, पूजा कलाल, चांदणी राठोड अशी संशयित आरोपी महिलांची नावे आहेत. या तिघही महिला मोलमजुरी करतात आणि रिकाम्या वेळेत बायबल वाचून प्रबोधन करत असल्याचं प्राथमिक पोलीस तपासात आढळून आलं आहे.

काही महिन्यांपूर्वी पुण्यामध्ये एका अल्पवयीन मुलीचं लव जिहाद च्या माध्यमातून धर्म परिवर्तन केल्याची खळबळ जनक घटना समोर आली होती. त्यानंतर अवघ्या काही दिवसातच पुन्हा एकदा बायबलच्या माध्यमातून मन परिवर्तन केलं जात असल्याचा प्रकार समोर आल्यानं हिंदुत्ववादी संघटनांकडून या प्रकाराचा निषेध व्यक्त केला जात आहे. दरम्यान या तीनही महिलांनी आपल्याला मारहाण केली असल्याचा आरोप करत पोलिसात तक्रार देखील केली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here