कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी खर्गे व थरूर यांच्यात थेट लढत

0
47

दिल्ली : आधी राहुल गांधी यांनी दिलेला नकार, त्यानंतर अशोक गेहलोत, मग दिग्विजय सिंग यांनी घेतलेल्या माघारीनंतर अखेर कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी दोन नावे समोर आलीत आहे. ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे व केरळचे खासदार शशी थरूर यांच्यात कॉंग्रेस अध्यक्षपदासाठी आता थेट लढत होणार आहे.

कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा अर्ज भरण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. त्यातच दिग्विजय सिंग यांनी उमेदवारीचा अर्ज घेऊन गेले होते. मात्र, त्यांनी हंगामी अध्यक्ष सोनिया गांधींशी चर्चा केल्यानंतर त्यांनी निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली. व त्यानंतर त्याच दिवशी सकाळी मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपला उमेदवारीचा अर्ज दाखल केला. तत्पूर्वी शशी थरूर यांनी आपला अर्ज दाखल केला. तसेच झारखंडचे माजी मंत्री के. एन. त्रिपाठी यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता, पण त्यांचा अर्ज बाद झाला आहे. त्यामुळे आता कॉंग्रेस अध्यक्षपदासाठी केवळ दोनच उमेदवार राहिले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख ८ ऑक्टोबर आहे.

कॉंग्रेस निवडणूक समितीचे अध्यक्ष मधुसुधन मिस्त्री यांनी याबाबतची माहिती देताना म्हटले आहे, की शुक्रवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी २० अर्ज दाखल करण्यात आले. ज्यात खर्गे यांचे १४, थरूर यांचे ५ व त्रिपाठी यांचा एक अर्ज होता. मात्र त्यातील ४ अर्ज सहीतील तफावतीमुळे बाद झालेत. त्यामुळे आता दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. जर माघारीच्या दिवशी ह्या दोघांपैकी कोणीही अर्ज मागे न घेतल्यास सदर निवडणूक प्रक्रिया पूर्ववत होईल.

जेव्हा कॉंग्रेस अध्यक्षपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला, तेव्हा राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे आघाडीवर होते. मात्र, त्यांच्या उमेदवारीच्या निर्णयामुळे तिकडे राजस्थानात मोठा राजकीय भूकंप झाला होता. त्यामुळे गेहलोत यांनी निवडणुकीतून माघार घेत ह्या गोंधळाबद्दल सोनिया गांधींची माफी मागितली होती. त्यानंतर पुढे दिग्विजय सिंग यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरु केली. तशी त्यांनी उमेदवारीचा अर्ज देखील नेला होता. पण जेव्हा हायकमांडकडून खर्गे यांच्या नावाची चर्चा सुरु होती, तेव्हा सिंग यांनी सोनिया गांधींची व नंतर खर्गेंची भेट घेत निवडणुकीतून माघार घेतली आणि आपण खर्गेंना पाठींबा देत असल्याची घोषणा केली.

तर दुसरीकडे शशी थरूर यांनी सुरुवातीपासूनच निवडणुकीच्या तयारीला लागले होते. त्यांनी आपला जाहिरनामादेखील प्रसिद्ध केला आहे. त्यात त्यांनी पक्षाच्या बदलासाठी आपण कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले आहे. पण थरूर यांच्यापेक्षा मल्लिकार्जुन खर्गेंना अनेकांचा पाठींबा असल्याचे चिन्ह दिसत आहे. कारण खर्गे हे पक्षातील वरिष्ठ नेते आहेत, ते विरोधी पक्षनेतेही होते. शिवाय तटस्थ सोनिया गांधी यांनी त्यांच्या उमेदवारीला दिलेला पाठींबा व ‘जी-२३’ या बंडखोर गटातील नेत्यांनीही त्यांना पसंती दिल्यामुळे खर्गेंची कॉंग्रेस अध्यक्षपदासाठी वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. आता येत्या ८ तारखेला होणाऱ्या अर्ज माघारीनंतर कॉंग्रेस अध्यक्षपदाचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here