कॉंग्रेसचा नवा अध्यक्ष गांधी घराण्याच्या बाहेरचा ? अशोक गेहलोत लढवणार अध्यक्षपदाची निवडणूक

0
16
congress

दिल्ली – कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूकीचे चित्र आता स्पष्ट होणार आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहेत. तशी घोषणा त्यांनी स्वतः केली आहे.

तिकडे राहुल गांधी भारत जोडो यात्रेत व्यस्त असताना पक्षाचे अनेक नेते अध्यक्षपदाच्या शर्यतीत आपली दावेदारी होते. यात अशोक गेहलोत यांच्यासह शशी थरुर, मनीष तिवारी व अन्य काही नेतेही अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. पण गेहलोत हे आत्तापर्यंत राहुल गांधींचे मन वळवण्याचा प्रयत्न करेन त्यानंतरच निर्णय घेईन, असे उत्तर देत होते. मात्र, शेवटी ते राहुल गांधींसोबत भारत जोडो यात्रेत सामील झाले व यादरम्यान राहुल यांनी निवडणूक लढवण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर गेहलोत यांनी आपण काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.

मात्र, या घोषणेसोबत गेहलोत यांनी राजस्थानचे मुख्यमंत्रीपद सोडणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ‘एक व्यक्ती एक पद’ नुसार मी मुख्यमंत्रीपद सोडणार असल्याचे गेहलोत यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, राजस्थानचा पुढील मुख्यमंत्री कोण असेल, याबाबतचा निर्णय सोनिया गांधी आणि प्रदेश प्रभारी ठरवतील असेही ते म्हणाले. त्यामुळे आता गेहलोत काँग्रसचे अध्यक्ष बनणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. म्हणजेच आता गांधी घराण्याबाहेरील व्यक्ती पक्षाचा अध्यक्ष बनू शकतो.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here