Nashik News | सत्ताधारी पक्षातील नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी दुष्काळाच्या प्रश्नावर सरकारला जबाबदार धरले होते. नांदगाव तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश नसल्याचे खापर आमदार कांदे यांनी प्रशासनाच्या माथी फोडले होते.
दरम्यान, विरोधकांनी थेट आमदारांनाच लक्ष्य केले. मराठा आरक्षणाच्या विषयावर नांदगाव तालुक्यातील राजकारण तापले होते. त्यात सत्ताधारी आमदार सुहास कांदे यांच्यासह विरोधी पक्षांनीही थेट राज्य सरकारला टार्गेट केले होते. हे वातावरण निवळते तोच आता नांदगावमध्ये दुष्काळावरून राजकारण पेटले आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे यांनी आक्रमक भूमिका घेत कालपासून उपोषण सुरू केले होते. तर, आज ठाकरे गटाचे नेते गणेश धात्रक यांनीही तहसीलदार कार्यालयावर मोठा फौजफाट्यासाह मोर्चा काढला होता. त्यामुळे सत्तेत असूनही आमदार तालुक्यातील नागरीकांसाठी काही करू शकत नाहीत. नागरीकांची तहान भागवू शकत नाहीये, त्यामुळेच विरोधी पक्षांना रस्त्यावर उतरावे लागल्याचा आरोप धात्रक यांनी यावेळी केला.
Gold Silver Rate | सोने-चांदीच्या दरात पुन्हा घसरण…
राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत नांदगावचे नाव नसल्याने त्याची झळ शेतकरी, नागरिकांना बसणार आहे. या भागात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळेच सर्वच सत्ताधारी, विरोधक आणि इतर संघटना याविषयावर अतिशय संवेदनशील असतात. आमदार कांदे स्वतः याविषयीच केलेल्या कामांमुळे स्पॉट झाले होते.
दरम्यान, दुष्काळाच्या यादीत नाव नसल्याचे खापर प्रशासनावर फोडण्यात येत आहे. पण, आता प्रशासनानेही हा आरोप फेटाळण्याचे काम सुरू केले आहे. मात्र, प्रशासन त्यांच्या स्तरावर काम करत आहे, अशी अप्रत्यक्षरित्या पाठराखण विरोधकांतर्फे झाली आहे. उपोषण सुरू करून राष्ट्रवादीने नेमक्या विषयाला हात घालत कोंडी केलीय. विशेष म्हणजे त्यांच्या विरोधात पाच माजी आमदारांनीही आता एकजूट केली आहे. दरम्यान, याप्रकरणी आता आ. सुहास कांदे कोणती राजकीय कांडी फिरवताहेत हे बघणे औत्सुक्याचे असणार आहे.
ACB trap: लाचखोरीचे कोटींचे उड्डाण..!, उप अभियंत्याला 1 कोटींची लाच घेतांना अटक
नांदगाव तालुक्यात दुष्काळी स्थिती आहे आणि ती पालकमंत्र्यांच्या मालेगाव आणि मंत्री भुजबळ यांच्या येवला तालुक्यापेक्षा जास्त आहे. मग, नांदगावच कसा यादीतून वगळला गेला. असा प्रश्न आ. सुहास कांदे यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या अडचणी वाढविण्याची तयारी त्यांचेच खास आ. सुहास कांदे यांनी केली आहे. मतदारसंघात विरोधकांनी घेरल्यावर कांदेंनी थेट सरकारच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला हे विशेष.
यापूर्वी त्यांनी सरकार आपल्या मतदारसंघाला दुष्काळग्रस्त जाहीर करेल, असा विश्वास व्यक्त केला होता. तो विश्वास पुणतः फेल गेल्याने त्यांची चांगलीच कोंडी करण्याची तयारी विरोधकांनी केली आहे.
सरकारचे दुष्काळाबाबतचे जे निर्देश आहेत, त्यात नांदगाव तालुका सर्व निकष पूर्ण करतो. सर्व निकष विचारात घेता, येवल्यापेक्षा जास्त दुष्काळ नांदगावमध्ये आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक नांदगाववर अन्याय होत आहे. याबाबत राज्य सरकारने हा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर न केल्यास तो अन्याय ठरेल. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात मी उच्च न्यायालयात दाद मागेल, असा इशारा देत आ. सुहास कांदे यांनी त्यांच्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे.
Nepal bhukamp: नेपाळ भूकंपाने हादरले 129 मृत्यू; भारतातही धक्के
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम