CNG PNG Price | सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार; सीएनजी, पीएनजीच्या किंमतीत वाढ

0
42
CNG PNG Price
CNG PNG Price

CNG PNG Price |  महागाईने त्रस्त सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या अव्वाचे सव्वा दरांनी जिकिरीला आलेल्या वाहनधारकांना आतापर्यंत सीएनजीमुळे दिलासा मिळत होता. मात्र, आता महानगर गॅस लिमिटेडकडून सीएनजी आणि घरगुती पीएनजीच्या किंमतीत वाढ करण्यात आली असून, यामुळे आता वाहनधारकांच्या खिशाला महागाईची झळ बसणार आहे. मंगळवार (दि. 9) जुलैपासून नवे दर लागू होणार आहेत. सीएनजीचे दर 1.5 रुपयांनी तर पीएनजीचे दर हे 1 रुपयाने वाढले आहेत. त्यामुळे आता सर्वसामान्य ग्राहकांना वाहन चालवण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहे. (CNG PNG Price)

टॅक्सी व रिक्षा भाडेही महागणार..?

या वाढ झालेल्या नवीन दरांनुसार मुंबईकरांना एक किलो सीएनजी हा ७५ रुपयांना तर, घरगुती पीएनजी ४८ रुपयांना मिळणार आहे. पेट्रोल, डिझेलचे दर परवडणारे नसल्याने सर्वसामान्य मुंबईकर आणि टॅक्सी व रिक्षा चालक हे मोठ्या प्रमाणात सीएनजीचा वापर करतात. मात्र, आता सीएनजीचे दर वाढल्यामुळे टॅक्सी व रिक्षा भाडेही महागण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे पीएनजीचेही दर वाढल्याने गृहिणींच्या स्वयंपाक घराचे गणितही कोलमडणार आहे. (CNG PNG Price)

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! ‘ही’ ट्रॅक्टर कंपनी लवकरच लॉन्च करणार CNG tractor

CNG PNG Price | अचानक दरवाढ का?

सीएनजी व पीएनजीचे दर अचानक का वाढवण्यात आले. याबाबत महानगर गॅसने माहिती दिली असून, सीएनजी, नैसर्गिक गॅस, पीएनजीच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत असून, मागणी व पुरवठ्याचे व्यस्त प्रमाणावर नियंत्रण ठेवण्यासाठी महानगर गॅसला मोठी कसरत करावी लागत असल्याने व बाजार मूल्यावर आधारीत खरेदी होत असल्याने दरवाढ करावी लागत असल्याचे स्पष्टीकरण महानगर गॅसच्या वतीने देण्यात आले आहे. (CNG PNG Price)

मात्र, आधीच एलपीजी, पेट्रोल, डिझेल यांच्या अव्वाच्या सव्वा दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागत आहे. त्यातच आता पावसामुळे वैतागलेल्या मुंबईकरांची यामुळे चिंता वाढणार असून, एकाचवेळी दोन्ही इंधन महागल्याने मुंबईकरांचे आर्थिक गणित कोमाडणार आहे. तर, विशेष म्हणजे सीएनजीचे दर वाढल्याने भाडे वाढवण्याची मागणीही टॅक्सी व रिक्षा चालकांकडून केली जात असल्याने हादेखील एक मोठा फटका मुंबईकरांना बसणार आहे.

‘Bajaj CNG Bike’ ची पहिली झलक; दुचाकी झाली कॅमेऱ्यात कैद


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here