CM Eknath Shinde Ayodhya Visit : मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याची जबाबदारी नाशिक शिवसेनेवर,

0
25

CM Eknath Shinde Ayodhya Visit: जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आयोध्येत जातात तेव्हा तेव्हा त्यांच्या नियोजनाची जबाबदारी ही नाशिकच्या शिवसैनिकांवर असल्याचे दिसून आले आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा देखील अजय बोरस्ते महत्वाची भूमिका बजावत होते, आता सत्ता बदलली असून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तरी देखील अयोध्या वारीची जबाबदारी बोरस्ते यांच्यावरच असल्याने नाशिकचे महत्त्व पुनः अधोरेखित झाले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्यापासून दोन दिवसांच्या अयोध्या दौऱ्यावर आहेत. याआधीही त्यांनी अयोध्येत येऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले आहे, तरी मुख्यमंत्रे झाल्यानंतर ते प्रथमच अयोध्येत येत आहेत. सीएम शिंदे यांच्यासोबत त्यांचे समर्थक खासदार आणि आमदारही अयोध्या यात्रेत सहभागी होणार आहेत. आज (7 एप्रिल, शुक्रवार) एकनाथ शिंदे यांचे समर्थक ठाणे आणि नाशिकहून अयोध्येला रेल्वेने रवाना होणार आहेत. अयोध्या दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही भेट घेणार आहेत. CM Eknath Shinde Ayodhya Visit

मुख्यमंत्री शिंदे 8 एप्रिल रोजी लखनौला पोहोचतील आणि 9 एप्रिल (रविवार) रोजी भगवान श्रीरामाचे दर्शन घेतील. 9 एप्रिलला संध्याकाळी ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार आहेत. अयोध्येतील लखनौ-अयोध्या रस्त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याशी संबंधित पोस्टर्स आणि बॅनर लावण्यात आले आहेत. पोस्टर्समध्ये लिहिले आहे- ‘श्री रामाच्या सन्मानासाठी हिंदुत्वाचा धनुष्यबाण घेऊन अयोध्येला जाऊया’ आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत नवा टीझरही रिलीज करण्यात आला. या दौऱ्यासाठी नाशिकचे अजय बोरस्ते , अनिल ढीकले, भाऊलाल तांबडे, बंटी तिदमे, राजु लवटे, संजय दुसाने आदि. पदाधिकारी मेहनत घेत आहेत.  CM Eknath Shinde Ayodhya Visit

सुराणा पतसंस्थेस २ कोटी ३३ लाखाचा नफा- अध्यक्ष डॉ रमणलाल सुराणा

मुख्यमंत्री शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याची तयारी जोरात, पोस्टर्सवर श्रीरामाचे नाव

मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याची जबाबदारी नाशिकच्या शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. त्यासाठी नाशिकहून विशेष गाडी आरक्षित करण्यात आली आहे. 13 हजारांहून अधिक शिवसैनिकही अयोध्येला जाणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे राम मंदिरात जाऊन महाआरती करणार आहेत. ते सरयू नदीच्या काठीही आरती करतील. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन त्यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येत पोहोचण्यापूर्वीच अयोध्येत त्यांच्या ‘चलो अयोध्या’चे पोस्टर-बॅनर लावण्यात आले असून, त्यामुळे संपूर्ण वातावरण आनंदमय झाले आहे. CM Eknath Shinde Ayodhya Visit

महाआरतीचा कार्यक्रम आणि रामलालाच्या दर्शनाने वातावरण भगवेमय झाले

CM Eknath Shinde Ayodhya Visitअयोध्येतील हनुमान गढी, राम मंदिर परिसरात ठिकठिकाणी एकनाथ शिंदे यांचे स्वागत करणारे पोस्टर लावण्यात आले आहेत. या पोस्टर्स आणि बॅनर्सवर भगवान श्री राम आणि छत्रपती शिवाजी महाराजांची छायाचित्रे आहेत. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची छायाचित्रे आहेत. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा फोटो लावण्यात आला आहे. पोस्टरमध्ये शिवसेनेचा झेंडा आणि धनुष्यबाणाचे चिन्हही नमूद करण्यात आले आहे. अशाप्रकारे या पोस्टर्स आणि बॅनरने वातावरण भगवेमय झाले आहे. CM Eknath Shinde Ayodhya Visit


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here