दिल्लीत कोरोना बाधितांची संख्या वाढत असून पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेला अलर्ट जारी करण्यात आला आहे. देशात चार लाखापर्यंत कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली होती. त्या तुलनेत तीन हजार बाधितांचा आकडा हा खूपच कमी आहे.
देशातील काही भागांत कोरोना रुग्णसंख्येमध्ये हळूहळू वाढ होताना दिसत आहे. सर्व व्यवहार सुरळीत झाले असतांना पुन्हा एकदा बंधने घालण्याची वेळ यायला नको यासाठी पंतप्रधान मोदींसह मुख्यमत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. रुग्णांमध्ये फ्ल्यू सदृश्य लक्षणे आढळल्यास त्यांची तत्काळ आरटीपीसीआर टेस्टींग करा, राज्यातील टेस्टिंगची संख्या तसेच लसीकरणाचा वेग वाढवा अशा सूचनाही दिल्या.
नागरिकांनी स्वत: हून मास्क वापरणे, लस घेणे अपरिहार्य असल्याचे नागरिकांकडून म्हणावी तशी काळजी घेतली जात नसल्याने भारतात काही राज्यांमध्ये पुन्हा मास्कसक्ती करण्यात आली आहे. देशातील दैनंदिन कोरोना बाधितांच्या संख्येने तीन हजारांची संख्या वाढली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पुन्हा बंधने नको असतील तर कोरोनाबाबत नियम पाळण्याचे आवाहन राज्यातील जनतेला केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम