CM Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा अनेकदा व्यक्त केलीय तसेच अजित पवारां यांच्या समर्थकांकडून दादा लवकरच मुख्यमंत्री होतीत, असं अनेकदा सूतोवाच केलं जात असल्याच दिसत आहेत. मात्र आज अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चाना उधाण आलं आहे.
मनोरा आमदार निवास इमारतीचे भूमिपूजन आज झाले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित नव्हते. त्यांच्यासाठी असलेल्या खुर्चीवर राहुल नार्वेकर यांनी अजित पवार यांना बसण्याची विनंती केली. मुख्यमंत्री शिंदे यांच्य खुर्चीवर लावण्यात आलेले लेबल काढले व नंतर अजित पवार त्या खुर्चीवर आसनस्थ झाले असल्याचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.
https://thepointnow.in/nitin-desai/
मुंबईमधील मनोरा आमदार निवासाच्या इमारतीचे आज भुमीपूजन करण्यात आले. या भूमिपूजन सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आमंत्रण असल्याने ते देखील उपस्थित होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला अनुपस्थित असल्याने त्यांच्या गैरहजेरीत हा सोहळा पार पडला.(bhumipujan)
दरम्यान मुख्यमंत्री गैरहजर असल्यामुळे एकनाथ शिंदे यांची चेअर रिकामी बघून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलावत मुख्यमंत्र्यांसाठी राखीव असलेल्या त्या रिक्त खुर्चीवर बसण्याची विनंती केली आणि या विनंतीची मान ठेवत उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील एकनाथ शिंदे यांच्या रिकाम्या खुर्चीवर विराजमान झाले.(cm ajit pawar)
अजित पवार बसण्याआधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रसंगावधान राखत एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीवर लावलेल नावाचा स्टीकर काढून बाजूला केले, त्यानंतरच अजित पवार य खुर्चीवर विराजमान झाले. मात्र अस असलं तरीही हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तर यामुळे आता राजकीय वर्तुळात देखील चर्चा रंगत आहेत.(ajit pawar)
काही दिवसांपासून अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. राज्यातील काही ठिकाणी यासंबधीत बॅनर देखील लागले असल्याच बघायला मिळालं. मात्र यावर प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री आहेत व तेच मुख्यमंत्री राहतील असं स्पष्ट केल होत. त्यानंतर या चर्चेला पुर्णविराम(full stop) मिळाला असला तरी मात्र या खुर्ची प्रकरणामुळे व पुन्हा एकदा या व्हिडीओमुळे चर्चेला उधाण आलं आहे.
अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री जरी असले तरी मात्र त्यांनी मुख्यमंत्री व्हावे ही अजित पवार गटातील पदाधिकाऱ्यांची आणि त्यांच्या समर्थकांची इच्छा आहे. यावरतून नेहमीच राज्यात संमिश्र स्वरूपातील चर्चा सुरू असतात काही दिवसांपूर्वीच राज्यात ठीक ठिकाणी मुख्यमंत्री असा उल्लेख केलेले अजित पवार यांचे बॅनर(banners) देखील झळकले होते.
यातच आता भाजपाचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अजित पवार यांना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसण्याचा आग्रह धरल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना तोंड फुटल आहे.(ajit pawar)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम