मागच्या दारातून राज्यसभेत घुसणारे ऐतखाऊ जनतेने निवडून दिलेल्यांना धमक्या देत आहेत; चित्रा वाघ यांची राऊतांवर सडकून टीका

0
36

द पॉईंट नाऊ ब्युरो : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यावर कडक शब्दात टीका केली आहे. राऊत यांनी बंड केलेल्या आमदारांना दिलेल्या आवाहनावर त्यांनी ही टीका केली.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास 40 हुन अधिक आमदारांनी बंड केले आहे. आणि या आमदारांना राऊत यांनी तुम्ही पुन्हा निवडून येऊन दाखवाच असं आव्हान केलं होतं. राऊत यांच्या याच आव्हानावर चित्रा वाघ यांनी टीका केली.

ज्यांनी आयुष्यात कधी जनतेमधून निवडणूक लढवली नाही. जे कायम मागच्या दाराने राज्यसभेत पोहोचले. ते ऐतखाऊ जनतेमधून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना पोकळ धमक्या देत आहेत. अशी सडकून टीका चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.

संजय राऊत हे शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार आहेत. आणि याच बाबीवर लक्ष केंद्रित करत चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

राज्यात ढवळून निघालेले राजकारण अजूनही शांत होण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. त्यात शिवसेनेद्वारे शिंदे गटाला वेगवेगळे इशारे दिले जात आहेत. आणि शिंदे गटाद्वारे देखील त्यास प्रत्युत्तर दिले जात आहे. अशातच आता चित्रा वाघ यांनी देखील राऊत यांना टोला लगावल्याने राऊत यावर काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here