भाजपमधील नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अपमान होत आहे. राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपतींच्या आग्रा सुटक्याची तुलना राज्यातील एका पक्षातील बंडखोरांशी केली आहे. याआधी राज्यपालांनी वक्तव्य करताना महाराज जुने झाले आहेत असं म्हणत त्यांची तुलना गडकरींशी केली होती. याधीही राज्यपालांकडून अनेक वेळा महाराजांचा अपमान केला गेला. त्याविषयी त्यांनी पश्चाताप हि व्यक्त केला नाही. एवढेच नाही तर भाजपाचा प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी यांनीही छत्रपतींचा अपमान केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितली असे त्यांनी सहज बोलून दाखवले. भाजप नेत्यांकडून वारंवार महाराजांचा अपमान होत आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्र संतप्त आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहेत. त्यांच्याचमुळे आज महाराष्ट्राची आपल्या स्वराज्याची निर्मिती झाली आहे. महाष्ट्रातील जनता महाराजांना देव मानते. त्यांची पूजा केली जाते. आणि याच महाराजांचा भाजप नेते वेळोवेळी अपमान करत आहेत. ‘सत्तेत असलेल्या आमदार व खासदार यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जर थोडासाही स्वाभिमान शिल्लक असेल तर, त्यांनी या अपमानाबद्दल तात्काळ राजीनामे द्यावेत’, अशी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ‘महाराजांबद्दल झालेला अपमान जनता कदापी सहन करणार नाही. याच महाराजांच्या नावाने मते मागून भाजप सत्तेवर आहे आणि आज त्याच दैवताचा तुम्ही अपमान करताय.तुमची ही वागणुक महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही.’
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम