Chhagan Bhujbal | राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे सध्या त्यांच्या वाद ग्रस्त विधानांमुळे चर्चेत आहेत. कालच अंजली दामणिया यांनी भुजबळ यांच्याविरोधातील कुठलीही केस ईडीने मागे घेतलेली नसल्याचे, सांगितले होते. दरम्यान, आता त्यांच्या विरोधात ईडीने ‘ती’ केस मागे घेतलेली आहे.
यामुळे आता सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुंपली आहे. यामुद्द्यावरून विरोधी पक्ष हे चांगलेच आक्रमक झालेले असून, कुणालाच अभय दिलेलं नसल्याचं भाजपकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, ईडीने जी केस मागे घेतलेली आहे ती नेमकी कुठली केस आहे?. आणि या केसबद्दल भुजबळ आणि ईडीला सुद्धा विसर पडला होता. दरम्यान, ईडीने जी केस मागे घेतलेली ती छगन भुजबळ यांना परदेश दौऱ्याची किंवा प्रवासाची होती. ती महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरण नाही.
Chhagan Bhujbal | छगन भुजबळ यांना क्लीनचिट नाहीच; महत्त्वाची माहिती समोर
भाजप सरकारकडे वॉशिंग मशिन
“भाजप सरकारकडे वॉशिंग मशिन आहे, त्यात माणूस टाकला की त्याचे सर्व कारनामे स्वच्छ होऊनच तो बाहेर येतो. त्यातीलच हा एक प्रकार असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी केली आहे. तर, यावर “सगळ्यांनीच चौकशीला सामोर जावं. हीच भाजपची भूमिका असून, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे राजकारण ही भारतीय जनता पार्टी करित नाही आणि अन्य कोणीही या प्रकरणी राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये, असे स्पष्टीकरण भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी दिले आहे.
Uddhav Thackeray | शिंदेंनी ठाकरेंना घेरलं; २५ वर्षाच्या कारभाराचे होणार ऑडिट
भुजबळांच्या मागे बोलविता धनी
ईडीने ह्या केसेस का मागे घेतल्या आहेत त्याची कारणं यांच्या सरकारने दिलीत पण, ती अतिशय हास्यास्पद असून, याचाच अर्थ मंत्री भुजबळ हे ज्या पद्धतीनं त्यांची प्रत्येक भूमिका अग्रेसिव्हपणे मांडतात. त्यांची तशी भूमिका असावी त्याला आमची हरकत नाहीच. मात्र, त्यावरुन त्यांच्यामागे कोणीतरी बोलवता धनी आहे, आणि हे असं बोलण्याचा हा पुरस्कारच त्यांना मिळाला असल्याचा खोचक टोला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे लगावला आहे.
ज्यावेळी राष्ट्रवादीतून अजित पवार गट हा बंड करुन शिंदे-फडणवीस सारकरसोबत सत्तेत सामील झाला. तेव्हाच्या केसमधून मी बाहेर आलो असून, ही केस डिस्चार्ज झाल्याचा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केला. अडीच वर्ष शिक्षा भोगली आम्ही. परंतु, आता ईडीने आपल्या विरोधातील ‘ती’ प्रमुख केसदेखील मागे घ्यावी, अशी मागणी छगन भुजबळांनी केली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम