सोमनाथ जगताप – प्रतनिधी : देवळा | चांदवड येथील महाराजा सुरजमल जाट शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय युवा दिन साजरा झाल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य संदीप भदाने यांनी दिली. अध्यक्षस्थानी देवळा येथील संस्था व्यवस्थापन समितीचे सदस्य भाऊसाहेब पगार होते. तर व्यासपीठावर अॅड. अभिलाषा दायमा, अनिल आहेर, स्वीकृत सदस्य गंगाधर सोनवणे, गटनिदेशक श्रीरत्न बरडे उपस्थित होते. प्रास्ताविक गटनिदेशक अविनाश वाघ यांनी केले. राष्ट्रीय युवा दिनानिमित्त संस्थेत घेण्यात आलेल्या चित्रकला, रांगोळी, निबंध, वक्तृत्व या स्पर्धातील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनात भाग घेतलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. यावेळी गंगाधर सोनवणे, गट निदेशक श्रीरत्न बरडे यांचीही भाषणे झाली. सूत्रसंचालन धनंजय दंडगव्हाळ यांनी केले. तर आभार विनोद पवार यांनी मानले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम