Deola | चांदवड- देवळा मतदारसंघातील पन्नास टक्के लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ

0
89
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | चांदवड- देवळा विधानसभा मतदारसंघात ७३ हजार महिलांच्या खात्यात (दि.१७) ऑगस्टपर्यंत मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे तीन हजार रुपये जमा होणार असून पैसे काढण्यासाठी शहरातील राष्ट्रीयकृत बँकांमध्ये शुक्रवारी (दि.१६) रोजी महिलांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली. चांदवड- देवळा मतदारसंघात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी (Ladki Bahin Yojana) महिलांनी उस्फुर्त प्रतिसाद देत अर्ज दाखल केले असून, यापैकी ७३ हजार महिलांचे अर्ज मंजूर झाले आहे.

Deola | लाडकी बहीण योजनेचा महिलांनी लाभ घ्या; विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका – आ. आहेर

त्यात चांदवड (Chandwad) तालुक्यात ४६ हजार तर देवळा (Deola) तालुक्यातुन २७ हजार महिलांची (दि.१५) ऑगस्टपर्यंत ७३ हजार अर्ज मंजूर झाले असल्याची अधिकृत माहिती मिळाली असून त्यात १४ व १६ ऑगस्ट रोजी अनेक महिलांच्या खात्यांवर पैसे आल्याचा संदेश आल्याने महिलांनी आनंद व्यक्त केला. यानंतर इतर महिलांनी देखील अर्ज भरण्यासाठी लगबग सुरू केली आहे.
लोकसभेच्या झालेल्या मतदानाच्या आकडेवारी नुसार चांदवड- देवळा मतदार संघात तीन लाख मतदार असून दोघे तालुके मिळून १,४२,६६० इतक्या महिला मतदार असून देवळा तालुक्यात ५५,६४० तर चांदवडमध्ये ८७ हजार महिला मतदार आहेत.

Deola | फुले माळवाडी येथे लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी शिबिराचे आयोजन

त्यात दोनही तालुक्यात पन्नास टक्क्याहुन अधिक महिलांचे अर्ज मंजूर झाल्याने महायुती सरकारला त्याचा येणाऱ्या निवडणुकीत निश्चितच लाभ मिळणार असून आणखी अर्ज भरून घेण्यात महायुतीचे कार्यकर्ते प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. नाशिक जिल्ह्यात चांदवड – देवळा मतदार संघात सर्वाधिक नोंदणी होऊन प्रथम क्रमांकांची नेण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी स्वीकारली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here