Chagan Bhujbal | इकडे मराठे आंदोलनच करत राहिले; तिकडे भुजबळांनी साधलं ओबीसींचं हित

0
36
Manoj Jarange
Manoj Jarange

Chagan Bhujbal | सध्या संपुर्ण महाराष्ट्रात मराठा आंदोलनाचा मुद्दा चांगलाच पोटलेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील मराठा समाज तापलेला दिसतो आहे. त्यातच मराठा नेते मनोज जरांगे-पाटील आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यात गेल्या काही दिवसांपुर्वी वादाची ठिणगी पडली होती. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यात वाद सुरू आहेतच तसेच छगन भुजबळांच्या प्रत्येक उत्तराला मनोज जरांगे आक्रमक प्रत्युत्तर देताना दिसता आहेत.

अशातच काल विधानसभेत इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी वसती गृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी ६० हजार रुपये मिळणार असल्याची घोषणा केलेली आहे. यासाठी ओबीसी आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी भुजबळांचे आभार मानलेले आहे.  त्यामुळे इकडे मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर मराठा समाज आंदोलन करत राहीला आणि तिकडे मंत्री छगन भुजबळांनी ओबसी विद्यार्थ्याचं हित साधलेलं आहे. दरम्यान आता सरकार ओबीसींप्रमाणे मराठा विद्यार्थ्यांसाठी काय उपाययोजना करता? तसेच यावरुन आता राज्यात कोणत्या वादाला तोंड फुटेल? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Big News | माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला; अजित पवारांकडून दिलगिरी

Chagan Bhujbal

मागास वर्ग, विमुक्त जाती आणि भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागाच्या स्वयंम आणि सामाजिक न्याय विभागाच्या स्वाधार योजनेच्या धर्तीवर शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना थेट लाभ देणारी महत्वाकांक्षी अशी ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना‘ राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे. दरम्यान या निर्णयाप्रमाणे, २१ हजार ६०० विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. भोजन भत्ता, निवास भत्ता व निर्वाह भत्ता विद्यार्थ्यांच्या थेट जमा होणार आहे.

मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेण्याऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी ६० हजार रुपये मिळणार असून इतर महसुली विभागातील शहरे आणि उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ५१ हजार रुपये मिळणार आहेत. तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी ४३ हजार तर तालुक्याच्या ठिकाणी ३८ हजार रुपयांचा विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here