केंद्र सरकारच्या बेजबाबदार पणामुळेच शेतकरी अडचणीत

0
17

 

 

द पॉइंट नाऊ: केंद्र सरकारच्या बेजबाबदार धोरणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना गहू ,साखर यातून चांगले उत्पादन मिळू लागले की केंद्र सरकारने निर्यात बंदी करते. केंद्र सरकारच्या या अडमुठे धोरणांमुळेच शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.

बोधेगाव (ता. शेवगाव) येथे सोमवारी (ता. ३०) माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्या जीवनावरील ‘महाराष्ट्र विधान मंडळातील बबनराव ढाकणे’ या पुस्तकाचे प्रकाशन आणि कारखान्याच्या ३० केएलपीडी क्षमतेच्या डिस्टिलरीचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

माजी केंद्रीय मंत्री ढाकणे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, कारखान्याचे अध्यक्ष अॅड. प्रतापराव ढाकणे, बुलडाणा अर्बन बँकेचे अध्यक्ष राधेश्याम चांडक, आमदार निलेश लंके, संग्राम जगताप, माजीमंत्री बदाम राव पंडित, माजी आमदार भानुदास मुरकुटे, दादाभाऊ कळमकर, पांडुरंग अभंग, नरेंद्र घुले, चंद्रशेखर घुले, मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनकुमार घोळवे, तज्ज्ञ संचालक श्रृषीकेश ढाकणे, डाॅ. प्रकाश घनवट, हर्षदा काकडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

श्री पवार पुढे बोलतांना म्हणाले की,
आम्ही केंद्रात सत्तेवर असताना शेतकरी हिताचे निर्णय घ्यायचोत. आता मात्र परिस्थिती फार बदललेली आहे. खासगी साखर कारखाने उभे राहिले. सहकारी तत्त्वावर देशातील पहिला साखर कारखाना धनंजयराव गाडगीळ, अण्णासाहेब शिंदे, पद्मश्री विखे पाटील यांच्या प्रयत्नातून नगर जिल्ह्यात झाला.

गडकरींनी साधला ऑनलाइन संवाद

नितीन गडकरी यांनी ऑनलाइन संवाद साधत साखरेची अधिक उत्पादन झाले आहे. सद्या कारखान्यांची संख्या देखील वाढत असून साखरेपासून इथेनॉल तयार झाले तरी ते वापरात येईल. त्यातून शेतकऱ्यांनाच चांगले पैसे मिळतील.
यापुढे भारतातील सर्व वाहने इथेनॉलवर चालवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here