CBSE 10th 12th Results | एकाच दिवशी १० वी आणि १२ वीचाही निकाल जाहीर

0
15
HSC Result
HSC Result

CBSE 10th 12th Results | गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला १० वी आणि १२ वीचा निकाल आज जाहीर झाला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) आज आधी इयत्ता १२ वीचा आणि आता १० वीचा निकालही जाहीर केला आहे. CBSE इयत्ता १२ वी आणि १० वीचा निकाल cbseresults.nic.in आणि cbse.gov.in बोर्डच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर झाला आहे. यासह DigiLocker वेबसाइट – digilocker.gov.in आणि UMANG ॲपवर देखील आता तुम्हाला हा निकाल बघता येणार आहे. इयत्ता १२ वी निकाल जाहीर झाल्यानंतर आजच १० वीचाही निकाल जाहीर करण्यात आला आहे. (CBSE 10th, 12th Results)

CBSE बोर्डद्वारे इयत्ता १२ वीच्या परीक्षेसाठी या शैक्षणिक वर्षात १६,३३,७३० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर, त्यापैकी १६,२१, २२४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यातून १४,२६,४२० विद्यार्थी हे परीक्षेत उत्तीर्ण झाले असून, यावर्षी सीबीएसई बोर्डात २४ हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. तर, १ लाख १६ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेत.(CBSE 10th, 12th Results)

CA Result 2024 | CA परीक्षेचा निकाल जाहीर; असे आहेत देशातील टॉप 3 CA

CBSE 10th 12th Results | यावर्षीही मुलींचीच बाजी..


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here