ऑनलाईन चाईल्ड पॉर्नोग्राफीप्रकरणी सीबीआयची देशभरात मोठी कारवाई

0
10

दिल्ली – केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजे सीबीआयने ऑनलाईन चाईल्ड पॉर्नोग्राफीप्रकरणी देशभरात मोठी कारवाई केली आहे.

सीबीआयने ह्या प्रकरणी २० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील ५६ ठिकाणी छापे टाकत ही कारवाई केली आहे. सिंगापूर आणि न्यूझीलंडच्या इंटरपोल युनिटने दिलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सीबीआयकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, ह्या गँग केवळ चाईल्ड पॉर्नोग्राफीशी संबंधित सामग्रीचाच नव्हे तर लहान मुलांचाही व्यापार करत असे. तसेच त्यांच्यावर शारीरिक अत्याचार केला जात होता. ही गँग वैयक्तिकरित्या किंवा एकत्र येत हे गैरप्रकार करत होते.

देशात चाईल्ड पोर्नोग्राफी प्रकरण एक चिंतेचा विषय बनला आहे. अनेक सोशल मीडिया साइट्सवर आज ही चाइल्ड पोर्नोग्राफीचे व्हिडिओ आणि मजकूर अपलोड होत आहे. ज्यावर सर्वोच्च न्यायालयानेही चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने याची गांभीर्याने दखल घेत संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कंपन्यांकडून उत्तरे मागवली आहेत. तसेच १९ सप्टेंबरच्या सुनावणीत कोर्टाने संबंधित कंपन्यांना सोशल मीडियावर चाईल्ड पोर्नोग्राफीचे व्हिडिओ अपलोड करण्यापासून रोखण्यासाठी काय पावले उचलली, याची विचारणा करत येत्या ६ आठवड्यात तसा अहवाल सादर करण्यास आदेश दिले आहे.

गतवर्षी चाइल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी सीबीआयने देशातील १४ राज्यांमधील ७७ ठिकाणी छापे टाकले होते. ज्यात सीबीआयने विविध शहरांतून ७ जणांना अटक केली होती. तसेच, या प्रकरणाशी संबंधित ५०हून अधिक व्हॉट्सअॅप ग्रुप व ५०००हून अधिक लोक सीबीआयच्या रडारवर होती.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here