Caste Based Survey | आज नागपूर येथे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस असून, काल रंजीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक विषयांवर भाष्य केले होते. यावेळी त्यांनी अनेक घोषणा देखील केल्यात. दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात जातींवर आधारित जनगणनेच्या बाबतीत महत्त्वाचे विधान केले आहे. समाजातील सर्व घटकांचे मत लक्षात घेऊन तसेच ह्या लोकांच्या भावना लक्षात घेऊन पुढील सर्व निर्णय घेतले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यावेळी म्हणाले.(Caste Based Survey)
राज्यात बिहारच्या धर्तीवर जातीय जनगणनेबाबत (Caste Based Survey)कुठलाही निर्णय हा समाजातील सर्व घटकांचे मत लक्षात घेऊन तसेच सर्वांच्याच भावना लक्षात घेऊन ह्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) चे संस्थापक के.बी.हेडगेवार व दुसरे सरसंघचालक एम.एस.गोळवलकर यांच्या रेशीमबाग येथील स्मारकांना भेट देत त्यांनी आदरांजली वाहिली.
जातीनिहाय जनगणनेमुळे राजकीय फायदा…
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांच्या ह्या विधानाआधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह श्रीधर गाडगे यांनी राज्यात जातीनिहाय जनगणना ही केली जाऊ नये, असे म्हटले होते. तसेच या जनगनणेमधून काय साध्य होईल असा सवालही त्यांनी केलेला होता. या सोबतच, गाडगे यांनी मध्यमांशी बोलताना सांगितले आहे की, ह्या जातनिहाय जनगणनेमुळे ह्या प्रकाराचा काही जणांना राजकीय हेतूने फायदा होऊ शकतो. कारण यातून राज्यातील एका विशिष्ट जातीची लोकसंख्या (Caste Based Survey) किती आहे, याबाबतचा डाटा मिळेल, पण सामाजिक आणि राष्ट्राच्या एकात्मतेच्या संदर्भात हे धोकादायक ठरू शकते.
Chhagan Bhujbal | ‘महाराष्ट्र सदन घोटाळा’ प्रकरणी भुजबळ पुन्हा अडकणार..?
काँग्रेसला जातीय जनगणनाच हवी..?
दरम्यान, काँग्रेस पक्ष हा संपूर्ण देशभरात जातींवर आधारित जनगणना करण्याच्या बाजूने आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आर.एस.एस ) कार्यकर्त्यांच्या टिकांबाबत प्रश्न केला असता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले की, महाराष्ट्र हे एक प्रगतीशील राज्य असून, त्याची संस्कृती व परंपरा ही देखील इतर राज्यांपेक्षा अनेक पटीने वेगळी आहे. येथे सर्वच समाजांचे तसेच सर्व जातींचे लोक येथे राहतात, काम करतात सर्व सण हे एकत्र साजरे करतात.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम