त्या उद्धव ठाकरेला कॉल लावा रे …! ; बापूंनी केला एकेरी उल्लेख

0
38

द पॉईंट नाऊ: भाजपला (Bjp) २०१९ मध्ये सोबत घेऊन लढलो, चांगलं यशस्वी झालो, पण, मुंबईत आल्यावर भाजपसोबत असणारी युती तोडल्याची बातमी समजली. परंतु, भाजप सोडून महाविकास आघाडी सोबत उद्धव ठाकरे का गेले? उद्धव ठाकरे यांनी युती तोडून देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत त्यांनी खंजीर खूपसला, असा आरोप शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलाय. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात ( Dasara Melava) भाषणादरम्यान शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली.

मुंबईतील बीकेसी मैदानावर शिंदे गटाचा मेळावा होत आहे. आणि इकडे शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे. या दोन्ही मेळाव्या करिता राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. याप्रसंगी बीकेसी मैदानावर भाषणादरम्यान शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

“बाळासाहेब ठाकरे तर शरद पवार यांना मैद्याचं पोतं म्हणायचे मग त्यांच्यासोबतच उद्धव ठाकरे तरी का गेले? आम्हा सर्व आमदारांना फरफटत नेऊन त्या राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलं गेलं. आम्ही गद्दारी केली नाही. भाजपसोबतची युती तोडली ही आमची चूक पक्षाचे हीत म्हणूनच आमच्याकडून झालेल्या चुकीचा पश्चाताप म्हणून आम्ही बंडखोरी केली आणि नंतर भाजपसोबत गेलो. जबरदस्तीने केलेली आघाडी आम्हाला पटली नाही. खरी शिवसेना कोणती हे लवकरच सर्वांना समजेल, असा टोला देखील शहाजीबापू पाटील यांनी यावेळी दिला.

उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख
भाषणादरम्यान बोलताना शहाजीबापू पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेचा नावाचा ऐकरी उल्लेख केला. “कोणाकडे फोन असेल तर उद्धव ठाकरेला फोन करून सांगा इकडे येऊन पाहून जा म्हणावं, कळेल मग त्यांनाही की खरी शिवसेना कोणाची आहे ते , असे भाषणादरम्यानचे शहाजीबापू पाटील यांचे उद्गार होते. मात्र हे सर्व शहाजी बापू पाटील एकेरी उल्लेख करून बोलले.

बाळासाहेब यांची एक क्लिप शिंदे गटाने दाखवली. खरे गद्दार कोण अशी घोषणा करणारी हि क्लिप असून तुम्हीच खरी गद्दारी केली असे शिवसेनेला खडेबोल या क्लिप मधून शिंदे गटाने सुनावले आहेत

शहाजीबापू पाटील यांच्या भाषणाला सुरुवात, ठाकरे यांना फोन करा अंडी पहा खरे भगवे वादळ असा टोला लगावत शहाजीबापू यांनी भाषणाला सुरुवात केली.

बाळासाहेब ठाकरे यांनी मैद्याचं पोत कोणाला म्हणाले? असा सवाल शहाजीबापू यांनी केला आणि नाव जोरात घ्या अश्या शब्दात त्यांनी टीका केली. शिंदे साहेबांशी गद्दारी नाही असे घडेबोल त्यांनी यावेळी सुनावले.

शिंदे गटाची दसरा सभा आज बीकेसी मैदानावर होणार आहे. या सभेसाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. आज सायंकाळी झालेल्या बैठकीला शिवसेनेचे पाच आमदार आणि दोन खासदार उपस्थित असल्याची माहिती खासदार कृपाल तुमाने यांनी दिली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here