मंत्रीमंडळ विस्तारात दोन महिलांना मंत्रीपद; नाशिकच्या या महिला आमदाराला मंत्रीपदाची संधी

0
31

मुंबई: राज्यात सत्तांतर झाल्यानंतर बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यानंतर ९ ऑगस्ट रोजी मंत्रिमंडळ विस्तार झाला. व राज्याला नवे कॅबिनेट मिळाले, यात शिंदे गटातील ९ तर भाजपचे ९ अशा एकूण १८ आमदारांनी शपथ घेतली. या मंत्रीमंडळ विस्तारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली कारण या १८ जणांमध्ये एकाही महिला नेत्याला स्थान दिलेले नव्हते. त्यावरून विरोधकांनी धारेवर धरले.

पुढच्या महिन्यात होणाऱ्या आगामी मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना स्थान मिळणार असल्याची माहिती असून. दोन महिला आमदारांना मंत्रिपदे दिली जाणार आहेत. अशी माहिती समोर आली असून एका महिला आमदाराला कॅबिनेट तर दुसऱ्या महिला आमदाराला राज्यमंत्रीपद दिले जाणार आहे. त्यामुळे अखेर महिलांना मंत्रिमंडळाच्या विस्तारात स्थान मिळणार असल्याने महिला वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

भाजपा आमदार माधुरी मिसाळ आणि देवयानी फरांदे
या दोन नावांची चर्चा आहे. देवयानी फरांदे या नाशिकच्या आमदार तर माधुरी मिसाळ या पुण्याच्या आमदार आहेत. तर मनिषा चौधरी व सीमा हिरे या दोघींची नावे सुध्दा चर्चेमध्ये आहेत. सीमा हिरे या नाशिकच्या आहेत. खास बाब म्हणजे या चारही महिला भाजपच्या असून यात शिंदे गटातील महिलांना स्थान नसल्याचे चित्र आहे.

९ ऑगस्टला मंत्रिमंडळ विस्तार पार पडले. त्यानंतर खातेवाटप देखील झाल. माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सामान्य प्रशासन, नगर विकास, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मृद व जलसंधारण, अल्पसंख्याक पर्यावरण व वातावरणीय बदल ही खाती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, गृहनिर्माण, ऊर्जा, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, राजशिष्टाचार ही खाती आहेत. यापैकी कोणती खाती कुणाला जातात हे बघणे महत्वाचे आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here