Political : आजच्या बैठकीत झाले हे मोठे निर्णय….

0
34

Political update : महाराष्ट्रातील राजकारणात झालेल्या मोठ्या बदलानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज पहिली बैठक पार पडली. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,political उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आठ मंत्री,  मुख्य सचिव मनोज सौनिक, सर्व विभागांचे प्रधान सचिव, वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते. या बैठकीत विविध प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली.political  त्यातील काही प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. यामध्ये आठ महत्वाच्या निर्णयांना मंजुरी देण्यात आली आहे.

*आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आलेले निर्णय पुढीलप्रमाणे*

जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय)

*मंगळवार ०४ जुलै २०२३ रोजी मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)*

• राज्याचे ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर. देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य. नवीकरणीय ऊर्जा political प्रकल्पांना मोठे प्रोत्साहन

• मराठा, कुणबी विद्यार्थ्यांना परदेशी उच्च शिक्षणासाठी सयाजीराव गायकवाड – सारथी शिष्यवृत्ती योजना. ७५ विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती

• दिंडोरी तालुक्यातील चिमणपाडा आणि त्र्यंबक तालुक्यातील कळमुस्ते येथील प्रवाही वळण योजनांना मान्यता.

• नागपूर येथील मे.शिवराज फाईन आर्ट लिथो वर्क्सच्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेणार. Political

• सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती, न्यायमूर्ती किंवा त्यांचे पती, पत्नी यांना सेवानिवृत्ती नंतरचे लाभ देण्यास मान्यता.

• सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली, गेळे आणि चौकुळ येथील कबूलायतदार गावकर जमिनीबाबत लवकरात लवकर निर्णय  घेण्यात येणार

• नागपूर कृषि महाविद्यालय येथे आंतरराष्ट्रीय कृषि सुविधा केंद्र स्थापन करणार

• मत्स्यबीज उत्पादन आणि मत्स्यबीज संवर्धन केंद्रांचा भाडेपट्टी कालावधी वाढवून आता २५ वर्षे  करण्यात आला आहे.

राज्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाला आहे एकीकडे काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत शिवसेनेवर दाबा सांगितला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी देखील बंडाचा हत्यार उपसा राष्ट्रवादीवर दावा सांगितला आहे. Political त्यातच जवळपास 40 आमदार सोबत घेऊन त्यांनी आठ जणांना मंत्रिपद मिळवून दिला आहे त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा सांगत प्रफुल्ल पटेल यांनी सुनील तटकरे यांना राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष घोषित केलं. आहे तर दुसरीकडे शरद पवार यांनी देखील क्षणाचाही विलंब न करता पुन्हा एकदा नव्याने पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. त्यातच महाराष्ट्राच्या विकासासाठी आपण शिंदे फडणवीस सरकार मध्ये हात मिळवणे केली असल्याचे सांगत अजित पवारांनी सत्तेमध्ये सामील होणं पसंत केलं त्यानंतर आज पहिली बैठक पार पडली.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here