IOCL Recruitment | इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये सतराशे साठ (१,७६०) जागांसाठी भरतीची नवीन अधिसूचना जाहीर करण्यात आलेली आहे. या भरतीअंतर्गत १० वी पास, आयटीआय, आणि बारावी ते पदवीपर्यंत शिक्षण घेतलेले उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवारांना पदानुसार आपले अर्ज ऑनलाइन स्वरूपात खाली दिलेल्या लिंक वरून २० नोव्हेंबर २०२३ पर्यंत जमा करता येणार आहेत.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमधील ही भरती संपूर्ण भारतभर होणार असून, या भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही. यामध्ये उमेदवारांना पगार पदानुसार आणि शासनाच्या नियमानुसार देण्यात येईल.
वयोमर्यादा
या जागांसाठी अर्ज करणार्या उमेदवाराचे वय हे १८ ते २४ वर्षांपर्यंत असणे गरजेचे आहे. तसेच, यामध्ये एससी / एसटी प्रवर्गातील उमेदवारांना ०५ वर्षांची तर, ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ०३ वर्षांची शिथिलता देण्यात आलेली आहे.
Chhagan Bhujbal | भुजबळांची अंतरवालीतून घोषणा; अंबडमध्ये ओबीसींचा महामोर्चा
शैक्षणिक पात्रता :
इंडियन ऑइलमधील ही भरती ट्रेड अप्रेंटिस तसेच, टेक्निशियन अप्रेंटिस ह्या पदांकरिता होणार आहे.
या पदांसाठी अर्ज करणार्या उमेदवाराने कमीत कमी मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेतून दहावी उत्तीर्ण, आयटीआय / बारावी उत्तीर्ण / बी.ए / बी.कॉम किंवा इतर कोणत्याही क्षेत्रातील पदवीधर असणे आवश्यक आहे.
महत्त्वाच्या तारखा :
१. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० नोव्हेंबर २०२३, सायंकाळी ५ वाजेपर्यंत
२. Admit Card डाउनलोड करण्याची तारीख – २७ नोव्हेंबर २०२३ ते २ डिसेंबर २०२३
३. लेखी परीक्षेची तारीख – ३ डिसेंबर २०२३
४. लेखी परीक्षेच्या निकालाची तारीख – १३ डिसेंबर २०२३
५. कागदपत्र पडताळणीची तारीख – १८ डिसेंबर २०२३ ते २६ डिसेंबर २०२३
crime news | मतदानाला आला, म्हणून चाकूने केला हल्ला
इतर महत्त्वाची माहिती :
१. उमेदवारांनी जाहिरात सविस्तर वाचून ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा खाली दिलेल्या लिंक वरूनच सादर करायचे आहे.
२. ऑफलाइन कुरिअरने किंवा पोस्टाने आलेले अर्ज नाकारले जातील.
३. उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा चालू ई-मेल आय-डी व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करावा.
४. अर्जामध्ये दिलेले माहिती खोटी किंवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
५. शेवटच्या तारखेनंतर अर्ज नाकारण्यात येतील.
६. भरतीचे तर सर्व अधिकार Indian Oil Corporation Lmt. कडे राखून ठेवण्यात आलेले आहे.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमधील भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Gram Panchayat Elections Result | ठरलं तर मग..! बघा जिल्ह्यात कुठे कोणाचा गुलाल
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम