या कारणांमुळे ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांचा दीड महिन्यातच राजीनामा

0
23

दिल्ली : ग्रेट ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी अवघ्या दीड महिन्यातच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यासह त्या सर्वात कमी कार्यकाळ असलेल्या ब्रिटनच्या पंतप्रधान बनल्या आहेत. याआधी १८२७ मध्ये जॉर्ज कॅनिंग हे ११९ दिवस पंतप्रधानपदावर होते.

दरम्यान, लिझ ट्रस यांनी राजीनाम्यानंतर माध्यमांशी बोलताना मी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न करू शकल्यामुळे व पक्षाचा विश्वास गमावल्यामुळे हा राजीनामा देत आहे, असे सांगतानाच पुढील आठवड्यात नव्या पंतप्रधानाची निवड होईपर्यंत मी या पदावर राहीन, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तोपर्यंत देशाची आर्थिक स्थिरता तसेच राष्ट्रीय सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असे ट्रस यांनी राजीनामा देताना बोलले आहे.

ही आहेत कारणे ?

लिझ ट्रस यांनी ६ सप्टेंबर २०२२ रोजी बोरिस जॉन्सन यांच्याकडून ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारली होती. मात्र अवघ्या दीड महिन्यातच त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, ब्रिटनमधील महागाई व राबवलेली अर्थविषयक धोरणे आणि त्यांनी मांडलेला ‘मिनी बजेट’.

मागील काही दिवसांपासून ब्रिटनमध्ये अन्नधान्यांच्या दरात भरमसाट वाढ झाली असून याच कारणमुळे येथील महागाई ४० वर्षांतील उच्चांकावर पोहोचली आहे. १९८० नंतरची ही दरवाढ सर्वात मोठी असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे आधीच आर्थिक आणि राजकीय संकटात असलेल्या लिझ ट्रस सरकारसमोर महागाईवर नियंत्रण आणण्याचे मोठे आव्हान उभे राहिले होते.

याचसोबत ट्रस यांनी गेल्या महिनाअखेरीस मांडलेला ‘मिनी बजेट’ हेदेखील वादात सापडले. नंतर अर्थमंत्री क्वासी क्वारतेंग यांच्यावर यातील कररचनेसंदर्भातील तरतुदी मागे घेण्याची नामुष्की आली. याच कारणांमुळे ट्रस यांनी अर्थमंत्री क्वासी क्वारतेंग यांची हकालपट्टी केली होती. त्यानंतरच्या नाट्यमय घडामोडींनंतर अखेर ट्रस या महिन्याभरताच पदावरून पायउतार झाल्या आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here