Breaking News | फडणवीसांना कळतंय ना नेमकं हे काय बोलतायत?-तेजस्वीनी पंडितचं ट्विट

0
36

Breaking News | ‘प्रवाशांच्या खासगी दुचाकी, तीन चाकी आणि चारचाकी गाड्यांना राज्यात टोल नाही. केवळ व्यवसायिक वाहनांकडून टोलदर वसुल केला जात आहे’, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल म्हणजे (दि.०८ ऑक्टोबर) रविवारी म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचे जोरदार पडसाद महारष्ट्रात उमटत आहे.  एकीकडे टोलनाक्यांवर खासगी चारचाकी वाहनांकडून सर्रास टोलदर वसुली केली जात असताना दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे वक्तव्य कसे काय करू शकतात, असा थेट सवाल अभिनेत्री तेजस्वी पंडित यांनी विचारलेला आहे.(Breaking News)

Raj Thackrey | … तर टोलनाके जाळून टाकू; राज ठाकरेंचा इशारा

टोलच्या मुद्यावर मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने देखील ट्वीटरवर एक व्हिडिओ शेयर करत काही सवाल उपस्थित केलेले आहेत. तेजस्वीनीने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केलेला आहे. जो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा असुन फडणवीस या व्हिडिओत पत्रकारांशी संवाद साधतांना दिसत आहेत.

“राज्यातील सगळ्या टोलवर चारचाकी आणि छोट्या गाड्यांना मुक्ती दिलेली आहे. महाराष्ट्रातील टोलवर आपण फक्त कमर्शियल आणि मोठ्या गाड्यांचे टोलदर घेतो.” असं  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या व्हिडिओत म्हणत आहे.

मग गेली इतकी वर्षे आम्ही टोल नक्की कोणाला भरतो?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खासगी वाहनांकडून टोलदरवसुली केली जात नसल्याचे वक्तव्य करताच अभिनेत्री तेजस्वी पंडितने फडणवीसांचा हा व्हिडिओ ट्विट करत उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या वक्तव्यावर आश्यचर्य व्यक्त केलेले आहे.

अभिनेत्री तेजस्वी पंडित या ट्विट म्हणते आहे की, फडणवीसांना कळतंय ना नेमकं हे काय बोलतायत ?? मग इतके वर्ष आम्ही जो टोल भरतो आहोत तो कुणाच्या खिशात जातोय ? राजसाहेब तुम्हीच आता काय ते करा, महाराष्ट्राला वाचवा ह्या टोल धाडीतून !! माननीय उपमुख्यमंत्री असे विधान तरी कसे करू शकता.

Election Commission: मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडसह 5 राज्यांतील निवडणूक जाहीर, भाजपा कॉँग्रेसचा कस लागणार

उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या टोलवरील वक्तव्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत कडाडून हल्ला चढवलेला आहे. फडणवीस तसे म्हणत असतील तर आम्ही टोलनाक्यांवर आमचे माणसे उभे करू आणि प्रवाशांच्या वाहनांना टोलदर  आकारु देणार नाही. पण, आम्हाला कुणी विरोध केला तर तो टोलनाकाच जाळून टाकू, असा इशारा देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिलेला आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here