Nashik | नाशिकचे पालकमंत्री भुसे कि भुजबळ? बोधीवृक्षाच्या फांदीरोपण कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष भुजबळ कसे? 

0
14

Nashik | त्रिरश्मी बुद्ध लेणी येथील बुद्ध स्मारकाच्या परिसरात २४ ऑक्टोबरला म्हणजे उद्या विजयादशमीला श्रीलंकेतील अनुराधापुरा येथील बोधीवृक्षाच्या फांदीरोपण केले जाणार आहे. या महोत्सवास देश-विदेशातून आणि जिल्ह्यांतून महत्त्वाच्या व्यक्ती तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने त्यांची सुरक्षितता आणि आनुषंगिक सोयी-सुविधांचे काटेकोर नियोजन करण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिलोल्या आहेत.

तसेच देश-विदेशातून येणारे भिक्खू यांच्याही भोजन आणि निवास व्यवस्था समिती सदस्यांशी चर्चा करून आवश्यकतेनुसार करण्यात यावी. कार्यक्रमाच्या ठिकाणी दिवसभर नागरिकांना पिण्याचे पाणी, मोबाईल टॉयलेट, वाहतूक व्यवस्था, रुग्णवाहिका यांच्यासह आनुषंगिक सेवा-सुविधा पुरविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शर्मा यांनी दिलेल्या आहेत. पांडव लेणी येथील बौद्ध स्मारक येथे मंगळवारी (दि.२४) बोधीवृक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यावेळी नागरिकांचीही गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या परिसरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आलेले असून तशी सूचना शहर वाहतूक विभागाकडून जारी करण्यात आलेली आहे.

Gold Price | दसऱ्याच्या मुहुर्तावर सोनं महागलं! जाणुन घ्या आजचा सोन्याचा भाव..

या कार्यक्रमच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे. उद्या होण्यार्या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष छगन भुजबळ का ? भुजबळ यांनी नेहमीच जातीपातीच राजकारण करून आपली पोळी भाजून घेतली आहे. मुंबईत २३ नोव्हेंबर १९८७ रोजी मोठ्या प्रमाणात बहुजन समाज हुतात्मा स्मारकावर जमला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी २४ नोव्हेंबरला तो संपूर्ण परिसर गोमुत्राने स्वच्छ केला होता. भुजबळ यांची बहुजन समाजाबद्दल काय भावना आहेत हे स्पष्ट होतंय. पहिले भुजबळांनी बहुजन समाजाची माफी मागावी नाहीतर उद्या होणार्या कार्क्यक्रमचे स्वागत भुजबळांनी करू नये अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केलेली आहे.

पालकमंत्री दादा भुसे असताना…. 

नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे असून त्यांच्याकडे बोधीवृक्षाच्या फांदीरोपण सोहळ्याच्या आयोजनाची जबाबदारी सोपवणे गरजेचं होतं. पण नाशिकचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यामागचे नेमके कारण काय? असा सवाल वंचित बहुजन आघाडीने उपस्थित केला. विजयादशमीला म्हणजे उद्या त्रिरश्मी बुद्ध लेणी येथील बोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण केले जाणार आहे.  तर  मराठा समाजास आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील सध्या राज्याच्या दौऱ्यावर असून ठिकठिकाणी बैठका घेत असुन ते मराठा समाजाच्या लोकांमध्ये जागृती निर्माण करत आहेत. त्यांनी सरकारला 24 ऑक्टोबरचा अल्टीमेटम दिलेला आहे. त्यानंतर एक सेकंदही थांबणार नाही, असे त्यांनी जाहीरही केलेले आहे. त्याच दिवशी जरांगे-पाटील यांनी दिलेल्या अल्टीमेटमची तारीख संपते आहे. त्यामुळेच त्याचदिवशी असलेल्या बोधीवृक्ष फांदीरोपण कार्यक्रमावर त्याचा विपरित परिणाम होणार नाही ना? अशी शंका देखील वंचित बहुजन आघाडीकडून उपस्थित करण्यात आलेली आहे.

Shirdi | साईबाबांची शिर्डी सजली; चार दिवसीय साईबाबा पुण्यतिथी महोत्सवास भाविकांची जमली गर्दी

 

पहाटे सहा वाजेपासूनच कार्यक्रम संपेपर्यंत याठिकाणी गर्दी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहर वाहतूक विभागाचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी वाहतूक मार्गात बदल आणि पर्यायी मार्गाबाबत अधिसूचना जारी केलेली आहे.

प्रवेश बंद मार्ग

  • क्लिक हॉटेल ते गरवारे टी पॉइंट या इंदिरानगर बाजूकडील सर्व्हिस रोडवरून जाणाऱ्या-येणाऱ्या मार्गावरील वाहतुकीस प्रवेश बंदी असणार
  • फेम सिग्नल ते कलानगर-पाथर्डी गाव सर्कल-पाथर्डी फाटा-गरवारे टी पॉइंट मार्गांवर अवजड वाहनांना प्रवेश बंदी असणार
  • गरवारे टी-पॉइंट ते पाथर्डी फाटा-पाथर्डी गाव सर्कल-कलानगर-फेम सिग्नल मार्गावर प्रवेश बंद असणार

पर्यायी मार्ग

  • क्लिक हॉटेल-गरवारे टी पॉइंट मुंबईकडे जाणारी सर्व वाहने क्लिक हॉटेल रॅम्पवरून मुंबईकडे वळवणार
  • फेम सिग्नलकडून मुंबईकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना द्वारका सर्कलमार्गे रॅम्पवरून उड्डाणपुलावरून मुंबईकडे वळवणार
  • गरवारेकडून नाशिकरोडकडे जाणारे अवजड वाहने उड्डाणपुलावरून द्वारका सर्कल-फेम सिग्नलवरून नाशिक रोडकडे वळवणार
  • पाथर्डी गावाकडून गरवारे, मुंबईकडे जाणारी सर्व वाहने पाथर्डी फाटा-ताज बोगद्यामधून अंबड सर्व्हिस रोड-महिंद्र शोरूम-सुदाल कंपनी-गरवारे टी पॉइंटकडून गौळाणेमार्गे मुंबईकडे वळवणार

author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here