मुंबई : दरवर्षी पार पडणारा शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा लक्षवेधी ठरणार आहे. कारण प्रथमच दोन वेगवेगळ्या नेत्यांचे मेळावे वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे. या दोन्ही गटाच्या दसरा मेळाव्याला आता अवघे काहीच तास शिल्लक राहिले आहेत. दोन्ही गटाकडून मेळाव्याची तयारी पूर्ण झाली असून, विविध शहरातून आलेले दोन्ही गटाचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झालेत आहे.
शिंदेगटाच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात अभूतपूर्व बदलानंतर शिंदेगटाचा हा पहिला दसरा मेळावा आहे. त्यामुळे यंदाच्या या दोन्ही नेत्यांच्या दसरा मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शिवाजी पार्कवर तर शिंदेगटाचा बीकेसी मैदानावर मेळावा पार पडतोय. शिंदे गटाच्या या मेळाव्यावरून आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे.
नेमके काय म्हणाले अंबादास दानवे ?
यावेळी दसरा मेळाव्यासाठी औरंगाबादहून निघताना अंबादास दानवे म्हणाले, शिंदे गटाचा दसरा मेळावा हा अमित शहांच्या ताटाखालच्या मांजराचा दसरा मेळावा आहे, अशी घणाघाती टीका दानवे यांनी एकनाथ शिंदेवर केली आहे. आमचा (ठाकरे गटाचा) दसरा मेळावा हा या गद्दारांच्या पिकाचा नायनाट करण्यासाठी आहे. पुढील दसरा मेळाव्यापर्यंत या राक्षसांचा नायनाट झालेला असेल, असेही यावेळी दानवे म्हणाले आहेत. तसेच एक दिवस भारतीय जनता पार्टीच या गद्दारांना मातीत मिसळवणार आहे, असा शब्दात दानवेंनी शिंदेंवर टीका करताना म्हणाले आहेत.
मुंबईतील दसरा मेळाव्याला निघण्यापूर्वी यावेळी अंबादास दानवे व औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी कर्णपुरा देवीचे दर्शन घेऊन तिची आरती केली. तसेच दसरा मेळावा यशस्वी होण्यासाठी खैरे व दानवे यांनी यावेळी ग्रामदेवतेला साकडेही घातले होते. कर्णपुरा देवी ही औरंगाबादचे ग्रामदैवता आहे. देवीच्या दर्शनानंतर चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे हे विमानाने मुंबईत दाखल झाले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम