Skip to content

ब्रेकिंग न्यूज: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील गुवाहाटीला रवाना ?


जळगाव: महाराष्ट्र राज्यात राजकीय संकट उद्भवले असून शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारला आहे. तीस ते चाळीस आमदार सोबत असल्याचे ते सांगत असून अनेक आमदारांसह ते गोवाहटीला आज सकाळी आले आहे. तसेच शिवसेनेचे गटनेते म्हणून एकनाथ शिंदे यांनी विधानसभा सभापतींना त्यांच्याकडील आमदारांची संख्या बळाचे पत्र दिलेले आहे. त्यातच आता भाजपकडून हालचालींना वेग आला असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पुण्यावरून गोवा सिटी कडे रवाना झाल्याचे वृत्त समोर येत आहे.

 

महा विकास आघाडी वरील राजकीय संकटावर आज मुंबईत शिवसेनेच्या तसेच राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षही आपापल्या आमदारांची बैठक घेत आहे. सध्याच्या परिस्थितीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे. तर शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांची मनधरणीचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत.

भाजपकडून हालचालींना वेग

शिवसेनेतील नाराज गटाला सोबत घेऊन भाजप महाराष्ट्र राज्यात सत्ता स्थापन करण्यात साठी आता प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानुसार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे गोवाहाटी कडे रवाना झाल्याचे माहिती समोर येत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!