Skip to content

‘एकही आमदार शिवसेनेतून फुटला तर त्याला रस्त्यावर तुडवा’; बाळासाहेब ठाकरेंचा तो व्हिडीओ होतोय व्हायरल


द पॉईंट नाऊ ब्युरो : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर आता शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होऊ लागला आहे. ”यापुढे एकही आमदार शिवसेनेतून फुटला, तर कायद्याची पर्वा न करता त्याला रस्त्यावर तुडवा” असे बाळासाहेब ठाकरे यांनी या व्हिडीओ मध्ये म्हटलेले आहे.

शिवसेनेला एकनाथ शिंदे यांनी 25 हुन अधिक आमदारांसह केलेल्या बंडामुळे जबर धक्का बसला आहे. त्यात आता शिवसेनेने आपल्या बंड केलेल्या आमदारांना पत्र पाठवून मुंबईत उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

आत्तापर्यंत शिवसेनेला सोडचिट्ठी देणारे अनेक बडे नेते आहेत. राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ, भाजपचे सुरेश प्रभू, नारायण राणे, बाळा नांदगावकर असे बडेबडे नेते शिवसेनेला रामराम ठोकून गेले. आणि आता कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे एकनाथ शिंदे यांनी देखील बंड केले आहे.

बाळासाहेब ठाकरे यांचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. शिवसेनेने दिलेल्या तिकिटावर निवडून जायचं आणि मग मार्ग बदलायचा. अशांवर बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी वक्तव्य केले होते. बाळासाहेब ठाकरे हे बेधडक वक्तव्यासाठी ओळखले जात होते. आणि त्यांनी एका सभेवेळी हे वक्तव्य केलेला हा व्हिडीओ व्हायरल होतोय.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घरी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेला जबर धक्का बसला आहे. आता शिवसेना पुढे काय पाऊल उचलते हे लवकरच स्पष्ट होईल.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!