BJP | गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यानंतर आज पुन्हा सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली असून, भाजपने राज्यसभेच्या निवडणुकीचे उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपकडून एकूण तीन जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. यात पहिली वर्णी लागली आहे. ती कालच नव्याने काँग्रेससोडून भाजपमध्ये दाखल झालेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची. त्यानंतर भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांचादेखील यात समावेश आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये तिकीट न मिळाल्यामुळे त्या नाराज होत्या. दरम्यान, आता अखेर भाजपने त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. यासोबतच अजित गोपछडे यांना देखील भाजपने राज्यसभेच्या निवडणुकांसाठी उमेदवारी जाहीर केली असून, अजित गोपछडे हे विदर्भातील भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांपैकी एक आहेत. ते गेल्या अनेक वर्षांपासून भाजपमध्ये कार्यरत आहेत. त्यांचे काम पाहता राज्यसभेच्या उमेदवारीचं बक्षीसच त्यांना पक्षाकडून मिळालं आहे.(BJP)
NCP Sharad Pawar | राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार..?
BJP | या नेत्यांना डावलले…
या उमेदवारांच्या नावांची यादी भाजपकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. मात्र, यात विशेष अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे या राज्यसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे तिकीट कापण्यात आले आहे. दरम्यान, कदाचित त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवलं जाऊ शकते. नारायण राणेंसोबतच भाजप नेते विनोद तावडे यांच्याही नावाची चर्चा होती. मात्र, त्यांनाही यावेळी संधी नसून, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनाही या राज्यसभा निवडणुकीत संधी मिळालेली नाही.(BJP)
उमेदवारी दिलेले अजित गोपछडे कोण ?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून भाजपामध्ये डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले बालरोगतज्ज्ञ डॉ. अजित गोपछडे यांना यावेळी भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे. नांदेडमधून लोकसभा व नांदेड आणि नायगाव विधानसभेसाठी नेहमीच चर्चेत असलेल्या डॉ. अजित गोपछडे यांना अखेर पक्षनिष्ठेचे बक्षीस मिळाले आहे.(BJP)
Ashok Chavhan | अशोकरावांना कुठल्याही पदाचा मोह नाही; पक्षप्रवेशानंतर कोण काय म्हणाले..?
अखेर मेधा कुलकर्णी यांची नाराजी दूर…
पुण्याच्या कोथरुड विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी या गेल्या अनेक वर्षांपासून पक्षात नाराज असल्याची चर्चा होती. त्या तब्बल दोन वेळेस कोथरुड या मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आल्या होत्या. मात्र, गेल्या विधानसभेत त्यांना वगळून त्यांच्याऐवजी मंत्री चंद्रकांत पाटील यांना तेथून उमेदवारी देण्यात आली होती. तिकीट कापल्यामुळे मेधा कुलकर्णी नाराज असून, त्यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांमध्येही नाराजी होती. दरम्यान, आता अखेर त्यांची नाराजी दूर करून त्यांची मनधरणी करण्यात भाजपला यश आले असून, त्यांचीही राज्यसभेच्या उमेदवारीसाठी वर्णी लागलेली आहे. (BJP)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम