औरंगाबाद – भाजप आमदार प्रशांत बंब यांनी पुन्हा नवीन मागणी करत नव्या वादाला तोंड फोडले आहे. आता विधानपरिषदेचे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघच रद्द करा, अशी मागणी आमदार बंब यांनी केली आहे.
भाजप आमदार प्रशांत बंब आणि शिक्षक यांच्यातील वाद काही मिटत नसल्याचे चित्र असतानाच, आमदार बंब यांच्या या नवीन विधानाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. दोन्ही मतदारसंघाची आता गरज राहिली नसून, शिक्षकांचे प्रश्न इतर आमदार सुद्धा मांडू शकतात असेही आमदार बंब म्हणालेत.
माध्यमांशी बोलतांना आमदार बंब म्हणाले, की यापूर्वी फक्त ३ टक्के सुशिक्षित लोक विधानभवनात असायची, त्यामुळे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निर्माण करण्यात आले होते. आता सर्वच आमदार सुशिक्षित आहेत, त्यामुळे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ बंद केली गेली पाहिजे. त्यांची आता गरज राहलेली नाहीत, खरेतर २० वर्षांपूर्वीच हे मतदारसंघ बंद केली पाहिजे होती. तसेच सर्वच आमदार आता सुशिक्षित असल्याने ते शिक्षकांचे प्रश्न सुद्धा विधानभवनात मांडतील, असे बंब म्हणाले.
दरम्यान, या विधानामुळे शिक्षकवर्गात संतापाची लाट उसळली असून अनेक शिक्षक व पदवीधर आमदारांनी प्रशांत बंब यांना खडेबोल सुनावले आहे. शिक्षक आमदार विक्रम काळे, अभिजित वंजारी यांनी प्रशांत बंबवर टीका केली आहे. तसेच शिक्षकांनी ह्या प्रकरणावर आक्रमक होत आमदाराविरोधात औरंगाबादेत मोर्चा काढला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम