पुणे – श्रीलंकेतील नेते जसे पळून गेले, तसेच शरद पवारांना बारामतीतून पळून जावे लागणार असल्याचे वक्तव्य भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे. बारामतीतील भाजपच्या मेळाव्यात पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार घणाघात केला आहे.
यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पडळकर म्हणाले, २०२४ला शरद पवारांचे विसर्जन करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे बारामतीत आले आहेत. एखाद्याला फसवून घ्यायचं लुबाडून घेण्यात बारामतीकारांना फार आनंद असतो. महाविकास आघाडीचे जेव्हा सरकार होते तेव्हा सुप्रिया ताई या खूप तोऱ्यात फिरायच्या, पण आता त्यांचा तो तोरा संपणार आहे. कारण निर्मला सीतारामन या बिनटाक्याचे ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टर आहेत. बारामतीचे ऑपरेशन त्या केव्हा करतील याचा कुणाला पत्ताही लागू देणार नाही, असा टोला पडळकरांनी लगावला.
तसेच, भाजपमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीचा नेहमीच सन्मान होत असल्याचे पडळकरांनी सांगितले. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळे यांना पक्षाने तिकीट दिले नव्हते. तेच बावनकुळे आता विधानसभेच्या २८८ मतदारसंघात तिकीट वाटप करणार असल्याचे पडळकर यावेळी बोलले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम