मुंबई : भाजप नेते अतुल भातखळकर यांनी उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांच्या निधनाबद्दल एक आक्षेपार्ह ट्विट केले आहे. त्यांच्या या ट्विटमुळे अनेकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उडवली आहे.
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांचे आज वयाच्या ८२व्या वर्षी निधन झाले आहे. ते गेल्या अनेक दिवसांपासून गंभीर आजारांनी त्रस्त होते. त्यांच्या निधनामुळे उत्तरप्रदेशातील एका गौरवशाली राजकीय कारकीर्दीचा शेवट झाला. दरम्यान, मुलायमसिंह यादव यांच्या निधनावर राजकारणापासून बॉलीवूडपर्यंत अनेक दिग्गजांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, अतुल भातखळकर यांनी एक वादग्रस्त ट्विट करत मोठा वाद केला आहे.
भातखळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “कारसेवकांवर गोळ्या झाडणारे मुलायमसिंह यादव यांचे निधन झाले. अयोध्येत राम मंदिराची निर्मिती ते पाहून गेले. प्रभू राम त्यांच्या आत्म्याला उत्तमगती देवो.” दरम्यान त्यांच्या ह्या ट्विटवर अनेकांनी टीकेची झोड उडवली आहे.
कारसेवकांवर गोळ्या झाडणारे मुलायम सिंह यादव यांचे निधन झाले. अयोध्येत राम मंदिराची निर्मिती ते पाहून गेले. प्रभू राम त्यांच्या आत्म्याला उत्तमगती देवो. pic.twitter.com/msDQtpoLXL
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 10, 2022
आज सकाळी मुलायमसिंह यांचे निधन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच भाजपच्या अनेक नेत्यांनीही मुलायमसिंह यादवांना श्रद्धांजली वाहिली होती. मात्र, भातखळकरांच्या या ट्विटमुळे भाजप मात्र तोंडघशी पडली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम