Big Offer! ‘या’ आलिशान SUV वर मिळतेय 11.85 लाखांची तगडी सूट

0
22

Big Offer : नवीन SUV कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी उपलब्ध आहे. कारण जीप कंपनीची आलिशान एसयूव्ही कार खरेदीवर तुम्ही 11.85 लाखांची बचत करू शकणार आहात. जीप कार उत्पादक कंपनी त्यांच्या अनेक एसयूव्ही कारवर डिसेंबर 2023 या महिन्यात मोठी सूट देत असून त्यामुळे या महिन्यात कार खरेदीवर तुम्ही देखील लाखो रुपयांची बचत करू शकतात.

Infotech news | थांबा..! एक QR Code Scan करताना ही काळजी घ्या, नाहीतर…

Jeep Cherokee Discount Offer

जीप कार कंपनीच्या Cherokee एसयूव्ही कारवर सर्वात मोठी सूट देण्यात येत असून या कारवर 11.85 लाख रुपयांची बंपर सूट दिली जात आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 80.50 लाख रुपये आहे तर कारवर देण्यात येत असलेल्या ऑफरमध्ये विशेष ऑफर, रोख सवलत, कॉर्पोरेट ऑफर आणि एक्सचेंज बोनसचा समावेश आहे. या महिन्यात Cherokee एसयूव्ही कार खरेदी करून तुम्ही देखील 11.85 लाख रुपयांची बंपर बचत करू शकता तसेच या कारमध्ये लक्झरी फीचर्स उपलब्ध आहेत.

Winter Session | उद्या हिवाळी अधिवेशन; आज नाटकीय घडामोडी

Jeep Meridian Discount Offer

जीप मेरेडियन एसयूव्ही कारवर देखील या महिन्यात मोठी सूट देण्यात येत असून मेरिडियन एसयूव्ही कारवर 4 लाख रुपयांची सूट देण्यात येत आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 33.40 लाख रुपये इतकी आहे. या ऑफरमध्ये विशेष ऑफर, रोख सवलत, कॉर्पोरेट ऑफर आणि एक्सचेंज बोनसचा समावेश आहे तसेच जीप मेरेडियन एसयूव्ही कारमध्ये 10.1-इंचाची मुख्य इन्फोटेनमेंट स्क्रीन, ऑल-डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, हवेशीर फ्रंट सीट्स, वायरलेस फोन चार्जिंग, 360-डिग्री कॅमेरा अशी वैशिष्ट्ये देण्यात आलेली आहेत.

Discount offer on Jeep Compass

जीप कार उत्पादक कंपनीच्या कंपासवर एसयूव्ही कारवर 1.50 लाख रुपयांची या महिन्यात सूट दिली जात असून यामध्ये विशेष ऑफर, रोख सवलत, कॉर्पोरेट ऑफर आणि एक्सचेंज बोनसचा समावेश आहे. कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 20.49 लाख रुपये इतकी आहे. कारमध्ये 2.0-लिटर टर्बो-डिझेल इंजिन दिले आहे जे 9-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडण्यात आलेले आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here