Big News | ठाण्यात मनसेचं जोरदार आंदोलन सुरु ..नेमकं प्रकरण काय ?

0
14

Big News | ठाण्यात टोल दर वाढीविरोधात मनसेचं आंदोलन सुरु आहे. मनसे नेते अविनाश जाधव याचं उपोषण सुरू आहे. दरम्यान मनसे नेते अविनाश जाधव यांची प्रकृतीदेखील बिघडलेली आहे. अशी माहिती आता समोर आलेली आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे अविनाश जाधव यांची भेट देखील घेणार आहे. ठाण्यातील मुलुंड चेकनाका येथे हे आंदोलन सुरु आहे. राज ठाकरे आणि अविनाश जाधव यांच्या भेटीनंतर कदाचित या आंदोलांनावर तोडगा निघू शकतो अशी देखील श्याक्याता आता वर्तवण्यात येत आहे.थोड्याच वेळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे अविनाश जाधव यांच्या भेटीला येणार.(Big News)

Low Maintenance Cars : जर तुम्हाला कमी मेंटेनन्स कार घ्यायची असेल, हे आहेत सर्वोत्तम पर्याय
टोलनाक्यावर नेमकं काय घडलं ?
एक भाजीविक्रेते रात्रीच्या सुमारास भाजी घेऊन जात असताना टोलनाक्यावर कारसाठी देण्यात येणारी पावती हि त्या भाजीविक्रेत्यांना देण्यात आली. मात्र त्यांच्याकडून टोलनाक्यावर टेम्पोचे दर आकारण्यात आले. आमच्यासोबत असं नेहमी घडत होतं मात्र आम्ही नेहमी घाईत असल्याने कधी चेक नाही केला मात्र काही दिवसांपूर्वी हि बाब लक्षात घेताच भाजीविक्रेते पुन्हा टोलनाक्यावरील कर्मचार्यांना हि गोष्टीची शहानिशा करायला गेले.तेव्हा टोलनाक्यावरील कर्मचार्यांनी चूक झाली असं स्पष्टीकरण दिल.परंतु हे जर माझ्यासोबत पंधरा वेळेस झाल असेल तर रोज नाशिकवरून येणाऱ्या कितीतरी गाड्यांसोबत हेच होत असेल. मी इथला रहिवाशी असल्याने मी या गोष्टीची शहानिशा करू शकलो पण आता टोल दरवाढ हि आमच्यासारख्या भाजीविक्रेत्यांसाठी प्रचंड अडचण निर्माण होत आहे.अशी प्रतिक्रिया भाजीविक्रेत्यांनी दिलेली आहे.

Nashik | अंगणवाडीत विद्यार्थांच्या पोषण आहारात आढळल्या अळया; चांदवडमधील घटना

मनसेची नेमकी मागणी काय ?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी आधी अनेकवेळा टोल दरवाढीवरून आंदोलन केलेले आहे. तसेच मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पूर्वी कोर्टात एक याचिका देखील दिलेली होती. पण आता PWD हे खातं मुख्यमंत्र्यांकडे असताना मुख्यमंत्री या गोष्टीकडे दुर्लक्ष कसे करू शकतात.आता जेव्हा राज साहेब इथे येतील तेव्हा या गोष्टीवर योग्य तो मार्ग काढला जाईल याची आम्हाला खात्री आहे.असं मत उपोषणकर्ते अविनाश जाधव यांनी मांडलेलं आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here